शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्याप्रकरण : तपासात थोडीतरी प्रगती दाखवा; एसआयटीला हायकोर्टाने फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:25 IST

पोलिसाने दिली ५० लाखांची ऑफर; सचिन अंदुरेने कोर्टात केले गंभीर आरोप  

ठळक मुद्देहे प्रकरण संपविण्यासाठी तपास अधिकारी अमृत देशमुख यांनी आपल्याला ५० लाखांची ऑफर दिल्याची तक्रार अंदूरेने कोर्टात केली आहे.इतरांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, थोडीतरी प्रगती दाखवा असं एसआयटीला हायकोर्टाने फटकारलं आहे.

मुंबई - कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावर (एसआयटी) आज हायकोर्टाची नाराजी व्यक्त केली आहे. इतरांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, थोडीतरी प्रगती दाखवा असं एसआयटीला हायकोर्टाने फटकारलं आहे. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी वापरलेलं हत्यार खाडीपात्रातून शोधण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी आवश्यक असल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे. दरम्यान, संशयित आरोपी सचिन अंदूरे याने या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावरच गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण संपविण्यासाठी तपास अधिकारी अमृत देशमुख यांनी आपल्याला ५० लाखांची ऑफर दिल्याची तक्रार अंदूरेने कोर्टात केली आहे.पानसरे हत्याप्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने एसआयटीला चांगलेच फैलावर घेतले. तसेच पानसरे हत्या प्रकरणातील तीन संशयित आरोपीच्या कोठडीत चार दिवसाने म्हणजेच  २० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अन्य संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी या संशयितांना कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. बेळगाव येथील जंगलात या संशयितांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यात आणखी तिघांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी हल्लेखोरांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तूल खाडीपात्रातून शोधण्यासाठी आणखी अवधी देण्याची मागणी सीबीआयने कोर्टाला केली. या तपासासाठी आणखी चार आठवड्यांचा अवधी आवश्यक असल्याचे सीबीआयने कोर्टाला सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovind Pansareगोविंद पानसरेPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग