पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्याचे विवस्त्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 08:06 PM2021-07-25T20:06:45+5:302021-07-25T20:07:00+5:30

Nude photo of a female police officer goes viral : विवस्त्र फोटो अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली.

Nude photo of a female police officer goes viral on social media | पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्याचे विवस्त्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्याचे विवस्त्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Next

बुलडाणा: पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याचे विवस्त्र फोटो अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी बुलडाणापोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनाक्रमामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Nude photo of a female police officer goes viral)

पोलीस दलात कार्यरत एका महिलेचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ही बाब संबंधीत महिलेस कळताच, तिला धक्का बसला. प्रकरणी या महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ज्या मोबाइल क्रमांकावरून हे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत, त्या विरोधात विनयभंगासह, आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. १७ ते १८ जुलैच्या दरम्यान ही घटना घडली होती. दुसरीकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले असून, तपास सुरू असल्याचे सांगितले. सोबतच हा तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले.

दुसरीकडे या संदर्भात सायबर सेलचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, अनुषंगिक कागदपत्रे तयार झाली असतील. मात्र, अद्याप आपल्यापर्यंत ती पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Web Title: Nude photo of a female police officer goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app