शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, नौपाडा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 1:05 AM

मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये (बीएआरसी) नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक

- जितेंद्र कालेकरठाणे : मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये (बीएआरसी) नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या अमृत मंडले (रा. सावरकरनगर, ठाणे) आणि रविराज चव्हाण (रा. वायफळे, तासगाव, जि. सांगली) या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मंडले आणि रविराज यांच्यासह पाच जणांनी कोल्हापूर (कळंबा) येथील तानाजी देसाई या लष्कारातील माजी सैनिकाच्या मुलाला बीएआरसीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली होती. गेल्या वर्षभरात त्यांच्या मुलाला नोकरीला न लावता पैसेही परत न केल्याने अखेर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ६ जानेवारी २०२० रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मंडले यांच्या टोळीने आतापर्यंत २० ते २५ जणांना ६० ते ७० लाखांचा गंडा घातला आहे. तो अशाच प्रकारे नोकरीला लावण्याच्या नावाखाली एका तरुणाकडून पैसे घेण्यासाठी ठाण्यात येणार असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लबडे यांच्या पथकाने ठाण्यातील तीन हात नाका येथून १७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी मंडले याला अटक केली.त्याच्या चौकशीतून त्याचा आणखी एक साथीदार रविराज चव्हाण यालाही १८ जानेवारी रोजी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. या दोघांसह पाच जणांच्या टोळक्याने बीएआरसीमध्ये बड्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याचे भासवून लष्करातील माजी सैनिक तानाजी देसाई यांच्याकडून पैसे उकळले.कोल्हापूरला तक्रारआमिष दाखवल्याप्रमाणे कुठेही नोकरी लागली नाही. त्यांचे पैसेही या टोळीने परत न केल्याने अखेर याप्रकरणी कोल्हापूरच्या राजावाडी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. ही तक्रार ६ जानेवारी रोजी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे