कपड्याच्या बटनावरुन ४८ तासांत उकलले ट्रॅक्टरचालकाच्या खुनाचे गूढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 05:01 PM2019-08-24T17:01:55+5:302019-08-24T17:09:04+5:30

घटनास्थळी पडलेल्या महिलेच्या कपड्याच्या बटनावरुन पोलिसांनी आरोंपींचा माग काढत त्यांना गजाआड केले आहे.

The murder case of tractor driver opned only in 48 hours due to cloth button | कपड्याच्या बटनावरुन ४८ तासांत उकलले ट्रॅक्टरचालकाच्या खुनाचे गूढ

कपड्याच्या बटनावरुन ४८ तासांत उकलले ट्रॅक्टरचालकाच्या खुनाचे गूढ

Next
ठळक मुद्देघटनास्थळी पडलेल्या बटनावरुन पोलिसांनी काढला आरोंपींचा माग खुनप्रकरणी महिलेसह दोघांना अटक

बारामती :  बारामती शहरानजीक मेडद गावच्या हद्दीत झालेल्या ट्रॅक्टरचालकाच्या खुनाचे गुढ ४८ तासात उकलण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.घटनास्थळी पडलेल्या महिलेच्या कपड्याच्या बटनावरुन पोलिसांनी आरोंपींचा माग काढत त्यांना गजाआड केले आहे.अनैतिक संबंधातुन ट्रॅक्टरचालक वैभव सुनिल लोंढे (वय २२) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मंगल सुनील सुर्यवंशी (वय २९,रा.शारदानगर,माळेगांव,ता.बारामती),गणेश जगन्नाथ कोळी (वय ३१, रा माळेगाव) अशी अटक केलेल्ेया आरोपींची नावे आहेत. 
 पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव यांच्या पत्नी कोमल लोंढे यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ट्रॅक्टरचालक लोंढे हे  मेखळीतील बरकडवाडी येथे वास्तव्यास आहेत. बुधवारी (दि. २१) दुपारी २ वाजता मला वास्तुशांतीसाठी जायचे आहे, असे सांगून ते घराबाहेर पडले. बुधवारी रात्री आठच्या सुमारास पत्नीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता मला यायला उशीर होईल, असे त्यांनी सांगितले. रात्री नऊच्या दरम्यान फोन केला असता दुचाकी पंक्चर झाली असून मला उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.गुरुवारी (दि २२) दुपारी मेडद गावच्या हद्दीत लोंढे याचा मृतदेह सापडला. 
घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बी.बी.जाधव कर्मचाºयांसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.  जाधव  यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळी शर्टची बटणे, बांगडी/गोट, दुचाकी ( एमएच.४२ .एस.५५३५) ,दुचाकीची चावी पडलेली होती. दुचाकीच्या क्रमांकावरुन त्यात वैभव सुनिल लोंढे (रा.मेखळी ता.बारामती जि.पुणे )यांचा खुन झाल्याचे उघड झाले.
घटनास्थळी मिळालेले काही तुटलेली बटणे व खुन करण्यासाठी फास दिलेली ओढणी देखील मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेली बटने आणि ओढणीच्या अनुशंगाने कसुन तपास सुरु केला. ही बटणे कोणत्या प्रकारची आहेत .त्यासाठी गावामधील विविध प्रकारच्या दुकानदारांकडे चौकशी करण्यात आली. यामध्ये हे बटण महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले. अशाप्रकारची बटने एका लेडीज टेलरकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन कोणत्या महिलेच्या कपड्यांना ही  बटने वापरली होती,याबाबत पोलीसांना शोध  घेण्यात यश आले. तसेच यामधुन ट्रॅक्टरचालकाचा खून केलेल्या महिलेचे नाव निष्पन्न झाले. तपासामध्ये गुन्हयातील पुरूष व स्त्री या दोन्ही आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक  धन्यकुमार गोडसे  करीत आहेत.पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधिक्षक जयंत मिना उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे , पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेशन चे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर आणि त्यांच्या सहकाºयांनी  गुन्हा उघडकीस आणला आहे.
————————————————————
 

Web Title: The murder case of tractor driver opned only in 48 hours due to cloth button

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.