शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

धक्कादायक! आधी प्रेमी युगुलाची केली हत्या, नंतर आत्महत्या भासवण्यासाठी दोघांनाही झाडावर लटकवलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 1:02 PM

आधी दोघांना मरेपर्यंत मारहाण केली आणि नंतर दोघांचे मृतदेह झाडावर लटकवले. या घटनेची सूचना मिळाल्यावर एसएसपी घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

उत्तरप्रदेशातील बरेलीमधून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका प्रेमी युगुलाची मारून मारून हत्या करण्यात आली आहे. अशी चर्चा आहे की, ही ऑनर किलिंगची घटना आहे. ही घटना मीरगंज पोलीस स्टेशन परिसरातील अम्बरपूर गावात घडली. हल्लेखोरांनी प्रेयसी आणि प्रियकराला प्रेम करण्याची अशी शिक्षा दिली की, लोकांच्या मनात भिती बसेल. त्यांनी आधी दोघांना मरेपर्यंत मारहाण केली आणि नंतर दोघांचे मृतदेह झाडावर लटकवले. या घटनेची सूचना मिळाल्यावर एसएसपी घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

बीए शिकणारा विद्यार्थी दिव्यानंद वडिलांच्या मृत्यूनंतर शेतात मोलमजुरी करून आपल्या परिवाराचं पोट भरत होता. असे सांगितले जात आहे की, दुपारच्या वेळी दिव्यानंद त्याच्या गव्हाच्या शेतात पाणी देत होता. अशात दिव्यानंदच्या शेजारी राहणारी त्याची प्रेयसीही शेतात त्याला भेटायला आली. (हे पण वाचा : प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश)

दोघेही  शेताच्या धुऱ्यावर बसून बोलत होते. अचानक मुलीच्या परिवारातील लोकांनी दोघांना एकत्र पाहिललं. ज्यानंतर त्या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी दोघांचेही मृतदेह झाडावर लटकवण्यात आले. (हे पण वाचा : दृश्यम स्टाइल मर्डर! प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....)

पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने पहिल्या नजरेतच आरोपींचा खेळ पकडला. गावात चर्चा आहे की, दिव्यानंद आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने जी ११ व्या वर्गात शिकत होती. दोघांचं प्रेम प्रकरण होतं. दोघेही नेहमीच जंगलात एकमेकांना भेटत होते.  गुरूवारी दोघांनाही मुलीच्या परिवारातील लोकांनी एकत्र पाहिलं होतं आणि दोघांची हत्या केली.

सध्या पोलिसांनी याप्रकरणी दोन लोकांना ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत. त्यासोबतच तरूणाच्या कुटुंबियाने मुलीचे वडील तेजराम आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा आरोप लावला असून तशी तक्रार दिली आहे. तर मृत तरूणाच्या पुतण्याने ही घटना होताना डोळ्याने पाहिलंय.

याबाबत एसएसपी रोहित सिंह म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने पुरावे जमा केले. प्राथमिक पाहणीत ही हत्येची घटना वाटते. घटनेनंतर २ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच आरोपींना अटक करून प्रकरणाचा खुलासा केला जाईल.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीMurderखूनHonor Killingऑनर किलिंग