प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 03:25 AM2021-01-29T03:25:13+5:302021-01-29T03:25:30+5:30

आरोपीच्या प्रेयसीसोबत मृत तरुणाने प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यामुळे त्याच्या मनात राग होता.

Murder of a friend in a love affair; Success in arrest of accused within 24 hours | प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश

प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश

Next

नवी मुंबई : महापे ते शिळफाटा रोडवर मंगळवारी अमीरूल हसन या तरुणाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी वेगाने तपास करून चोवीस तासांत जुबेर खान या आरोपीला अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून त्याने हा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

शिळफाटा रोडवरील नाल्याजवळ मंगळवारी मृतदेह आढळून आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. मृतदेहाचे फोटो पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठविले असता तळोजा पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी या तरुणाला ओळखले. त्याचे नातेवाईक चौकशी करीत पोलीस स्टेशनला आले होते. ओळख पटताच तांत्रिक तपासाच्या आधारे हा खून अमीरूलचा मित्र जुबेर खान याने केल्याचे लक्षात आले. आरोपी उत्तर प्रदेशमधील मूळ गावी जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. मयत व आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपीच्या प्रेयसीसोबत मृत तरुणाने प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यामुळे त्याच्या मनात राग होता. त्याला धडा शिकविण्यासाठी त्याच्यासोबत रिक्षामध्ये डोंबिवलीमध्ये जाण्यासाठी निघाला व वाटेत चाकूने वार करून खून केल्याचे तपासात उघड झाले .

परिमंडळ १ चे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले की, २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात् वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, यशवंत पाटील, निवृत्ती शिंदे, विश्वास काजरोळकर, दीपक महाडिक, अनिल यादव, वैभव पोळ, अनिल मोटे, शिवाजी बाबर, संजय ठाकूर, सतीश बडे, ईश्वर जाधव, संतोष काकड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांची दक्षता
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी उत्तर प्रदेशमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु पोलिसांनी मृतदेह आढळल्यानंतर वेळ न घालविता मृतदेहाची ओळख पटविली व तत्काळ आरोपीचा शोध लावून त्याला अटक केली.  

Web Title: Murder of a friend in a love affair; Success in arrest of accused within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून