T20 World Cup 2024 : दोन जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. आगामी स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात आहे. अशातच विविध देशातील माजी खेळाडू भविष्यवाणी करत असून कोण प्रभावी ठरेल याबाबत भाष्य करत आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराने विश्वचषकाचे चार सेमीफायनलिस्ट जाहीर केले आहेत. यामध्ये त्याने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघावर विश्वास दाखवला नाही.
तसेच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना व्हायला हवा, असे लाराने सांगितले. क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार ब्रायन लाराने सांगितले की, वेस्ट इंडिजच्या संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. त्यांच्याकडे चांगल्या खेळाडूंची फौज आहे. सांघिक कामगिरी केली तर त्यांना रोखणे कठीण आहे. भारतीय संघ पहिल्या चारमध्ये असेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अंतिम सामना झाल्यास तो प्रेक्षणीय ठरेल. मला वाटते की, भारत, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि विश्वविजेता इंग्लंडचा संघ सेमीफायनसाठी पात्र ठरेल.
विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ -रोवमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्लेस, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकिल हुसैन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, Sherfane Rutherford आणि रोमॅरियो शेफर्ड.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ