शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:48 IST

Raja Raghuvanshi and Sonam: इंदौरमधील राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही उलगडलेले नाही. पोलीस या प्रकरणात तपास करत असून एक नवीन माहिती समोर आली आहे. 

Raja Raghuvanshi and Sonam Latest News: हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँग येथे गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम या जोडप्यासोबत काय घडले, याबद्दलचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. पोलीस या प्रकरणात तपास करत असून, वेगवेगळी माहिती आता समोर येत आहे. दोघांचा हॉटेलमध्ये जातानाचा एक व्हिडीओ मिळाला. त्यानंतर त्यांच्या दुचाकीचे लोकेशन समोर आले असून, त्यांची रेकी केली गेली, असेही समोर आले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजा रघुवंशी आणि सोनम यांनी शिलाँगमध्ये पोहोचल्यानंतर एक दुचाकी भाड्याने घेतली होती. अॅक्टिवा घेऊन ते फिरायला गेले होते. त्यांच्या दुचाकीचे शेवटचे लोकेशन आता मिळाले आहे. दुपारी दोन वाजता गाडीचा वेग शून्य झाला होता. 

वाचा >>३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले

गाडीच्या जीपीएस लोकेशन दिसले आहे. जीपीएस लोकेशननुसार २ वाजता सोनम आणि राजासोबत ही काहीतरी विचित्र घटना घडली. त्यापूर्वी दोघांची काही गुंडांनी रेकीही केली होती. त्यामुळे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान दोघांसोबत काहीतरी घडले असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. 

राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली आहे. हत्या करून त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला. तर सोनम अजूनही बेपत्ता आहे. त्यामुळे तिचे अपहरण झाले आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत. 

परत येताना राजाने आईला केला होता कॉल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३७ वाजता सोनमने तिच्या आईला कॉल केला होता. दोघी दोन मिनिटे बोलल्या. त्यानंतर डोंगरावरून परत येताना राजाने १ वाजून १३ मिनिटांनी त्याच्या आईला कॉल केला होता. ते त्यांचे शेवटचे संभाषण होते. 

दरम्यान, राजा रघुवंशीचा मृतदेह इंदौरला आणण्यात आला. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. सोनमच्या वडिलांनी पुजाऱ्याच्या सांगण्यावरून तिचा फोटो घराच्याबाहेर उलटा लावला आहे. सध्या शिलाँग पोलीस सोनमचा शोध घेत असून, तिचा भाऊही पोलिसांच्या मदतीसाठी गेला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार