ऑनलाईन पैसे उकळण्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 07:48 AM2021-09-17T07:48:27+5:302021-09-17T07:49:14+5:30

उत्तर प्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्रात सायबर क्राईमचे गुन्हे सर्वाधिक असल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिली आहे.

maharashtra ranks third in online money laundering pdc | ऑनलाईन पैसे उकळण्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची माहिती

ऑनलाईन पैसे उकळण्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची माहिती

googlenewsNext

विकास झाडे, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्रात सायबर क्राईमचे गुन्हे सर्वाधिक असल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) दिली आहे. यातील बहुतांश प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने पैसे उकळण्याचे आहेत. महाराष्ट्रात २०२० मध्ये ५ हजार ४९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण सर्वाधिक असून, गेल्यावर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२० मधील सायबर क्राईम

- ऑनलाईन बँकिंग फसवणूक- ४,०४७
- ओटीपीद्वारा फसवणूक -१,०९३
- क्रेडिट/डेबिट कार्डद्वारा फसवणूक- १,१९४
- एटीएमशी संदर्भातील गुन्हे- २,१६०
- महिला, बालकांसंबंधी गुन्हे- ९७२

Web Title: maharashtra ranks third in online money laundering pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.