'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:13 IST2026-05-11T12:12:54+5:302026-05-11T12:13:28+5:30

एका तरुणावर नाव बदलून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, त्यांचं शोषण करणं आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

lucknow love trap case against hindu girls with fake identity blackmailing and conversion shoaib akhtar arrested | 'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सैरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणावर नाव बदलून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, त्यांचं शोषण करणं आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून धक्कादायक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

शोएब अख्तर असं या आरोपीचं नाव असून तो गोंडा येथील रहिवासी आहे. शोएब सैरपूर परिसरातील रैथा रोडवर एक सलून चालवतो. असा आरोप आहे की, शोएबने सोशल मीडियावर आपली खरी ओळख लपवून 'सौरभ सिंह' या नावाने फेक इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केलं होतं. याच फेक प्रोफाईलच्या माध्यमातून तो हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत असे.

मोबाईलमध्ये सापडले फोटो आणि व्हिडीओ

पोलिसांच्या तपासात शोएबचा मोबाईल अनेक गुपितं उघड करत आहे. आरोपीच्या फोनमध्ये अनेक अल्पवयीन हिंदू मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सापडले आहेत. आरोपी शोएब आधी मुलींना फूस लावून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आणि नंतर त्यांचे अश्लील फोटो-व्हिडीओ काढून घ्यायचा. याच व्हिडिओच्या जोरावर तो नंतर मुलींना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकायचा.

एका अल्पवयीन पीडितेने हिंमत दाखवून सैरपूर पोलीस ठाण्यात शोएबविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेने आपली व्यथा सांगत आरोपीच्या काळ्या कृत्यांचा पाढाच पोलिसांसमोर वाचला.

अनेक मुलींना अडकवलं जाळ्यात

एसीपी (बीकेटी) ज्ञानेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शोएब सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट्सची सखोल चौकशी केली जात आहे. तपासाच्या आधारे पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, शोएबने आतापर्यंत किती मुलींना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे आणि या कटात त्याच्यासोबत आणखी काही लोक सामील आहेत का? लखनौ पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
 

Web Title : शोएब बना 'सौरभ', लड़कियों को फंसाया; ब्लैकमेल, धर्मांतरण का खेल उजागर।

Web Summary : लखनऊ में शोएब ने 'सौरभ' बनकर हिंदू लड़कियों को प्रेम जाल में फंसाया, उनका शोषण किया और धर्मांतरण का दबाव डाला। पुलिस ने उसे गिरफ्तार किया, ब्लैकमेल के लिए इस्तेमाल की गई आपत्तिजनक तस्वीरें और वीडियो बरामद किए। अपराधों की पूरी सीमा और साथियों की पहचान के लिए जांच जारी है।

Web Title : Shoaib used 'Saurabh' to trap girls; blackmail, conversion exposed.

Web Summary : Shoaib, posing as Saurabh, lured Hindu girls, exploited them, and pressured them for religious conversion in Lucknow. Police arrested him after a victim complained, uncovering compromising photos and videos used for blackmail. Investigations continue to determine the full extent of his crimes and identify any accomplices.