शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲप मेसेजमधील लिंक उघडली अन् क्षणार्धात २१ लाख रुपये गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 08:19 IST

मोबाइलवर एक व्हॉट्सॲप संदेश व त्याबरोबर एक लिंक आली. ती लिंक उघडताच एका निवृत्त शिक्षिकेच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये लंपास करण्यात आले.

अण्णामय्या :

मोबाइलवर एक व्हॉट्सॲप संदेश व त्याबरोबर एक लिंक आली. ती लिंक उघडताच एका निवृत्त शिक्षिकेच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये लंपास करण्यात आले. आंध्र प्रदेशातील अण्णामय्या जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

वरलक्ष्मी असे या निवृत्त शिक्षिकेचे नाव असून, त्यांना मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप संदेश आला. त्यात एक लिंक दिलेली होती. वरलक्ष्मी यांनी ती लिंक उघडताच त्यांचा फोन हॅक झाला. त्यांच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये काढून घेण्यात आले. इतकी मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरलक्ष्मी यांनी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी सायबर पोलीस तपास करत आहेत. 

अज्ञात व्यक्तींनी वरलक्ष्मी यांच्या बँक खात्यातून आधी २० हजार, मग ४० हजार रुपये व त्यानंतर ८० हजार रुपये काढले. मग टप्प्याटप्प्याने 
एकूण २१ लाख रुपयांवर डल्ला मारला. 

यासंदर्भात पोलीस अधिकारी मुरलीकृष्णा यांनी सांगितले की, अण्णामय्या जिल्ह्यातील मदनपल्ली येथील रहिवासी असलेल्या निवृत्त शिक्षिका वरलक्ष्मी यांनी व्हॉट्सॲपवर आलेल्या संदेशाबरोबर असलेली लिंक अनेकदा उघडली. त्यामुळे प्रत्येक वेळा त्यांच्या बँक खात्यातून पैसे लंपास करण्यात आले. त्यांचा फोन हॅक करण्यात आला होता. या प्रकारानंतर काही वेळाने खात्यातून २१ लाख रुपये वळते झाल्याचे त्यांना एसएमएस आले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

सॉफ्टवेअर कर्मचाऱ्यालाही घातला गंडा
मदनपल्ली येथील ज्ञानप्रकाश व्यक्तीलाही काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला होता. त्यात दिलेली लिंक उघडल्याने ज्ञानप्रकाश यांच्या बँक खात्यातील १२ लाख रुपये अज्ञात व्यक्तींनी लंपास केले होते. ज्ञानप्रकाश हे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 
 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप