शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरण, सहा आरोपींना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 20:08 IST

Kidnapping case of 4 year-old boy : न्यायालयासमोर हजर, तपासात आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता

ठळक मुद्दे न्यायालयाने हे ग्राहय धरून आरोपींना पुन्हा सहा मार्चपर्यंत पीसीआर वाढवून दिला.

अमरावती : चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींचा पीसीआर (पोलीस कोठडी) २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला. मात्र, या प्रकरणात आणखी महत्त्वाचा उलगडा होणे गरजेचे असल्याने राजापेठ पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर करून आरोपीविरुद्ध पोलिसांनी गोळा केलेले सबळ पुरावे न्यायालयासमोर ठेवले. तसेच या गुन्ह्यात आरोपींकडून आणखी तपासाची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने हे ग्राहय धरून आरोपींना पुन्हा सहा मार्चपर्यंत पीसीआर वाढवून दिला. 

अटक केलेल्या सातवी आरोपी रुखसार शेखला १ मार्चपर्यंत पीसीआर मिळाला. ६ मार्चपर्यंत पीसीआर मिळालेल्या आरोपींमध्ये हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५, रा. फलटण चौकी कोठला अहमदनगर), अल्मश ताहीर शेख (१८, रा. कोठला अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंदनगर अहमदनगर), आसिफ हिनायत शेख (२४, रा. कोठला अहमदनगर), फैरोज रशिद शेख (२५, रा. कोठला अहमदनगर), मोनिका जसवंतराय लुणीया(४७, रा. शारदानगर अमरावती) यांचा समावेश आहे.दोन आरोपी अद्यापही पसारचया घटनेतील मास्टरमाईंड इसार शेख ऊर्फ टकलू व त्याचा साथीदार अज्जू अजीज हा अद्यापही फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहे. दोन्ही आरोपी मुंबईत पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, जोपर्यंत ते हाती लागत नाही तोपर्यंत घटनेचा तपास पूर्ण होऊ शकत नाही. आरोपी हाती लागल्यानंतर आणखी किती आरोपींचा यात सहभाग आहे, हे स्पष्ट होईल.गुन्ह्यात वापरलेले मोबाईल होणार जप्त?अटकेतील आरोपींकडून पाच कोटींच्या खंडणीसाठी दादीच्याच सांगण्यावरून अपहरणाचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मात्र, गुन्ह्यात वापलेले चार ते पाच मोबाईल अद्याप जप्त केले नाही. पोलीस सदर मोबाईल जप्त करणार असून, याप्रकरणी दोन कार व दुचाकी जप्त केलेल्या आहेत. 

आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून ते न्यायालयासमोर ठेवले. यात आणखी तपासाची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले. ते न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना ६ मार्चपर्यंत पीसीआर वाढवून दिला आहे. - मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजापेठ

टॅग्स :Courtन्यायालयKidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटक