शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:40 IST

अभिषेक आणि खुशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, खुशीच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते.

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील शिवाजी नगर या भागात एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाचे नाव अभिषेक प्रजापत असे असून,  आता त्याच्या कुटुंबाने काही धक्कादायक आरोप केले आहेत. अभिषेकच्या कुटुंबाला सुरुवातीपासूनच या प्रकरणात वेगळाच संशय येत होता. कुटुंबाने या प्रकरणी आणखी तपास करण्यात यावा अशी मागणी केली होती. या दरम्यानच आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने संपूर्ण घटनेला एक वेगळे वळण दिले आहे.

सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये अभिषेकची गर्लफ्रेंड देखील दिसली आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेकची गर्लफ्रेंड खुशी फाशीचा दोर स्वतःच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे.  इतकंच नाही तर ती तलवार कधी आपल्या मानेवर तर कधी पोटावर ठेवून अभिषेकला धमकी देताना दिसत आहे. 'तू मला सोडलंस तर मी माझा जीव देईन', अशी धमकी ती अभिषेकला देत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

आत्महत्येच्या वेळी अभिषेक ज्या तरुणीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता, तिचे नाव खुशी आहे. अभिषेकच्या कुटुंबीयांनी म्हटले की, अभिषेक आणि खुशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, खुशीच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते. अभिषेकचे वडील रामहित प्रजापत यांनी गंभीर आरोप केले आहेत की, खुशी आणि तिच्या कुटुंबीयांनीच अभिषेकला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. त्यांनी अनेकवेळा अभिषेकला मारहाण करून नाते तोडण्यास भाग पाडले होते.

सततचा मानसिक दबाव 

अभिषेकच्या कुटुंबीयांनी सांगितले की, खुशी वारंवार व्हिडीओ कॉलवर फास, तलवार किंवा स्वतःला इजा पोहोचवण्याचे नाटक करून अभिषेकवर दबाव आणायची. या सततच्या मानसिक त्रासामुळे अभिषेक तणावात राहायचा. अभिषेकच्या वडिलांनी पुढे आरोप केला की, काही महिन्यांपूर्वी खुशीच्या कुटुंबाने खोटी तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे भागीरथपुरा चौकीत अभिषेकला अटक करून ठेवण्यात आले होते. खूप प्रयत्नांनंतर अभिषेकची सुटका झाली, पण पोलिसांनीही त्याला खुशीपासून दूर राहण्यास सांगितले होते. सततच्या धमक्या, मारहाण आणि ब्लॅकमेलिंगमुळे अभिषेक आतून पूर्णपणे खचला होता.

तपासणीसाठी मोबाईल जप्त

१४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी अभिषेकच्या धाकट्या बहिणीने त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि तिने आरडाओरडा करून वडिलांना बोलावले. अभिषेक कुटुंबाचा आधार होता; त्याचे वडील नाश्त्याचा स्टॉल चालवतात, तर कुटुंबात दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. घटनेनंतर पोलिसांनी अभिषेकचा मोबाईल जप्त केला आहे. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, आत्महत्येच्या काही मिनिटे आधीपर्यंत तो खुशीशी बोलत होता. यामुळे त्याचा मोबाईल, चॅट, कॉल रेकॉर्ड आणि व्हिडीओ आता तपासाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनले आहेत.

अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल आणि सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.   

English
हिंदी सारांश
Web Title : Girlfriend's torture drives youth to suicide; family alleges foul play.

Web Summary : Indore youth Abhishek Prajapat committed suicide due to alleged harassment by his girlfriend, Khushi. A video shows Khushi threatening self-harm. The family accuses her and her family of driving him to suicide through constant pressure and blackmail.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश