शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

८ वी पास रुग्णवाहिका चालक झाला डॉक्टर, स्टेथोस्कोप घेऊन फिरायचा अन्...; किडनी रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:41 IST

कानपूर पोलिसांनी एका मोठ्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये आतापर्यंत ६० हून अधिक ट्रान्सप्लान्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कानपूर पोलिसांनी एका मोठ्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये आतापर्यंत ६० हून अधिक ट्रान्सप्लान्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत 'आरोही' आणि 'आहूजा' रुग्णालय सील करण्यात आली असून संचालक डॉक्टरांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही गँग टेलिग्रामच्या माध्यमातून डोनर आणि रिसिव्हर शोधत असे. आठवी उत्तीर्ण असलेला रुग्णवाहिका चालक शिवम अग्रवाल डॉक्टर असल्याचं खोटं सांगून रुग्णांना जाळ्यात ओढायचा. रात्रीच्या वेळी गुपचूप कोणत्याही नोंदीशिवाय रुग्णालयांमध्ये या सर्जरी केल्या जात होत्या.

आठवी शिकलेला शिवम अग्रवाल रुग्णवाहिका चालक होता, पण गळ्यात स्टेथोस्कोप घालून तो डॉक्टर असल्याचं लोकांना भासवायचा. तो रुग्णांचा विश्वास संपादन करून त्यांना ट्रान्सप्लान्टसाठी तयार करत असे. तपासात असं समोर आलं आहे की, कानपूरमधील रुग्णालयांमध्ये सुमारे ४० ते ५० सर्जरी झाल्या आहेत, ज्यामध्ये एका परदेशी महिलेच्या ट्रान्सप्लान्टचाही समावेश आहे. शिवमच्या अटकेनंतरच या गुन्ह्याचे धागेदोरे हाती लागले.

या रॅकेटचं डिजिटल नेटवर्क मेरठचा डॉक्टर अफझल चालवत होता. त्याने टेलिग्रामवर एक स्पेशल ग्रुप तयार केला होता, जिथे अवयव दान करणारे आणि गरजवंत यांची भेट करून दिली जात असे. याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बिहारच्या समस्तीपूर येथील एमबीएर्षाचा विद्यार्थी आयुष याला डोनर म्हणून आणि मेरठच्या पारुल तोमरला रिसिव्हर म्हणून जोडलं गेलं. पैशांच्या व्यवहारापासून ते सर्जरी नियोजनापर्यंत सर्व गोष्टी पोलिसांची नजर टाळण्यासाठी या ॲपवर केल्या जात असत.

सर्जरीसाठी गुन्हेगारांनी अत्यंत चपळाईने मार्ग अवलंबला होता. सर्जरीच्या दिवशी रुग्णालयातील नियमित कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जात असे आणि एक विशेष टीम येऊन सर्जरी करत असे. त्यानंतर लगेचच रुग्णांना एका ठिकाणी हलवलं जाई, जेणेकरून कोणताही पुरावा उरणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे, कोणत्याही रुग्णाची नोंद किंवा हिस्ट्री ठेवली जात नव्हती. 'आहूजा हॉस्पिटल'मध्ये अशा ७-८ सर्जरी झाल्याची पुष्टी झाली आहे.

डीसीपी वेस्ट कासिम आब्दी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलीस फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध घेत असून मोबाईल फोनची तपासणी केली जात आहे. या खुलाशामुळे उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या देखरेख यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एक रुग्णवाहिका चालक इतक्या मोठ्या प्रमाणावर खोटा डॉक्टर बनून किडनी ट्रान्सप्लांट करत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 8th Pass Ambulance Driver Became Doctor; Kidney Racket Exposed

Web Summary : Kanpur police busted a kidney racket involving over 60 transplants. An 8th-grade ambulance driver posed as a doctor, luring patients. The gang used Telegram to connect donors and recipients, conducting surgeries in secrecy. Hospitals were sealed, and arrests were made, exposing a major healthcare system failure.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर