शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

इंटरनेट, व्हायग्रा, फेक कॉल्स... लैंगिक शक्तीच्या नावावर लुटत होती मुंबईतील टोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 3:22 PM

लैंगिक गोळ्या ऑनलाईन विकण्याच्या बहाण्याने काही ठगांनी अनेक अमेरिकन लोकांना करोडो रुपयांना चुना लावला.

ठळक मुद्देमोहम्मद उसमा अहमद ईशर चौधरी, मुजफ्फर जफर शेख आणि मोहम्मद अल्ताफ सईद मेमन यांना अटक केली आहे.या ठगांनी एम एस अली मार्गावर छोटा सोनापूर परिसरात एक कॉलसेंटर बांधले होते.

मुंबई - ठग हे नेहमीच नागरिकांचा कमकुवतपणा जाणून घेतात आणि त्याचा फायदा उचलून त्यांना त्याद्वारे आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांची फसवणूक करतात. मात्र, आपल्यातील कमकुवतपणामुळे असे नागरिक ज्यांची फसवणूक झालेली असते ते पोलिसांकडे तक्रार करायला. लैंगिक गोळ्या विकत घेणे हा सुद्धा एक कमकुवतपणा आहे. लैंगिक गोळ्या ऑनलाईन विकण्याच्या बहाण्याने काही ठगांनी अनेक अमेरिकन लोकांना करोडो रुपयांना चुना लावला. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अकबर पठाण म्हणाले की, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने मोहम्मद उसमा अहमद ईशर चौधरी, मुजफ्फर जफर शेख आणि मोहम्मद अल्ताफ सईद मेमन यांना अटक केली आहे.

या ठगांनी एम एस अली मार्गावर छोटा सोनापूर परिसरात एक कॉलसेंटर बांधले होते. तेथे बरेच कर्मचारी ठेवले होते, ज्यांचे इंग्रजी प्रभुत्व  आहे आणि बोलण्याचा आवाज, इंग्रजी उच्चार असे होते की एखादा अमेरिकन कॉल करीत असल्यासारखे वाटत असे.हा फोन इंटरनेटद्वारे वापरला जात होतापोलीस सांगतात की हे अमेरिकन लोकांना व्हीओआयपीद्वारे (VOIP) कॉल करायचे. त्यांना व्हायग्राच्या वेगवेगळ्या योजना आणि सेक्सशी संबंधित इतर गोळ्यांबाबत माहिती दिली जात असे आणि अधिक गोळ्या मागवून त्यांचा घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकेल अशी बतावणी करून ऑर्डर घेतली जात असे. जर एखाद्या अमेरिकनने ऑर्डर दिली असेल तर त्याला बँक खाते क्रमांक सांगितला जाई आणि त्यात रक्कम हस्तांतरित करण्यास सांगत. आरोपींना जेव्हा खात्यावर पैसे येत तेव्हा त्यांच्यावर लैंगिक वर्धक गोळ्या त्यांच्या पत्त्यावर पाठविण्याचा दबाब असे. मात्र, समोरची व्यक्ती पैसे ऑनलाईन हस्तांतरित केल्यानंतर आरोपी त्यांना बऱ्याचदा गोळ्या पाठवत नसत आणि त्यांची फसवणूक करत. कामगारांना भरघोस पगार आरोपींनी वरिष्ठ निरीक्षक केदारी पवार, निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने आणि अमित भोसले यांच्या तपास पथकाला सांगितले की, ते इंटरनेट कॉल करीत असल्याने त्यांना परदेशातील पोलीस कधीच शोधू शकणार नाहीत हे त्यांना ठाऊक होते. त्यांना हे देखील माहित होते की, पीडित व्यक्तींनी जगात कुठेही सेक्स गोळ्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तक्रार केली नाही, म्हणूनच हे लोक फसवणूक करण्याचा त्यांचा व्यवसाय अगदी सहजपणे चालवत होते. गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेल्या या कॉल सेंटरवर शुक्रवारी मालमत्ता कक्षाने धाड घातली. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना भरघोस पगार देण्यात येत होता.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई