He saw on my mobile how death happens and in a few moments the boy committed suicide | मृत्यू कसा होतो हे मोबाईलवर पाहिले अन् काही क्षणात मुलाने घेतला गळफास

मृत्यू कसा होतो हे मोबाईलवर पाहिले अन् काही क्षणात मुलाने घेतला गळफास

ठळक मुद्देहर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय १३, रा. शिंदखेडा जि.धुळे) या मुलाने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता तुकारामवाडीत घडली. हर्षल हा मामाकडे आला होता.

जळगाव : मृत्यू कसा होतो हे मोबाइलमध्ये ऑनलाईन बघितले आणि नंतर त्या वेबसाइटवर जन्म तारीख टाकली, मृत्यू कधी व कसा होतो हे पाहिले आणि काही क्षणातच मोबाईलमध्ये पाहिल्याप्रमाणेच हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय १३, रा. शिंदखेडा जि.धुळे) या मुलाने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता तुकारामवाडीत घडली. हर्षल हा मामाकडे आला होता.

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकारामवाडीतील मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. आजी काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्याने मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाइट बघितल्या व यानंतर बाथरूममध्ये जाऊन साडी बांधून गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे. चौकशीत त्यांनी  मुलाकडील  मोबाइल जप्त केला आहे.

Web Title: He saw on my mobile how death happens and in a few moments the boy committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.