शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या डोक्यात हातोडा मारून केली हत्या, दारू पिऊन आईशी भांडण करत असल्याने केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 09:03 IST

Crime News: दारुच्या नशेत आईसोबत भांडण करणाऱ्या वडिलांच्या डोक्यात हातोडा मारून मुलानेच त्यांची हत्या केल्याची घटना दहिसरमध्ये घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी संदीप उर्फ बाळा अण्णाराव बनसोडे (२५) याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : दारुच्या नशेत आईसोबत भांडण करणाऱ्या वडिलांच्या डोक्यात हातोडा मारून मुलानेच त्यांची हत्या केल्याची घटना दहिसरमध्ये घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी संदीप उर्फ बाळा अण्णाराव बनसोडे (२५) याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. दहिसर परिसरात राहणाऱ्या  अमोल अण्णाराव बनसोडे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.  ६० वर्षीय अण्णाराव बनसोडे बांधकाम मंजूर होते, तर भाऊ बदलीवर चालक म्हणून काम करतो. वडील दारुच्या नशेत घरात येऊन आईला मारहाण करायचे. सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. संध्याकाळी सातच्या सुमारास वडील बेशुद्ध पडल्याचे मित्राकड़ून समजताच तो घरी गेला. घरी पोहोचत असताना भाऊ संदीप रस्त्यात भेटला. त्याच्याकडे विचारणा करताच, समोर आलेल्या माहितीत त्याला धक्का बसला. संदीपने सांगितले की, पप्पा दारू पिऊन घरात आईशी  भांडण करत होते. मी घरी आलो. त्यावेळी पप्पांनी घरातील स्वयंपाक गॅसचे बटन चालू केल्याने सुरुच होता. तसेच पप्पा हातोड्याने घरातील लादी तोडत होते. आईलाही शिविगाळ करत होते. मी  त्यांंना अडविण्यासाठी गेलो असता पप्पांंनी मलाही शिविगाळ करून मारहाण केली. याच रागात घरातील टोच्या उचलून त्यांच्या पाठीत खुपसला. त्यानंतरही पप्पा माझ्या अंगावर धावून आल्याने मी  लादीवर पडलेला हातोडा उचलून पप्पांच्या डोक्यात मारला. त्यामुळे  पप्पा घरात लादीवर  बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे सांगितले. त्याने तत्काळ घरी धाव घेत जवळच्या डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमोलने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यानुसार मंगळवारी पहाटेच्या सुमारास भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी