शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वाचं ढोंग करून लुटले आजीला; घामाच्या दुर्गंधीमुळे पकडले आरोपीला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 16:05 IST

वृद्ध महिलेसमोरून लंगडत गेलेल्या चोराने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला

ठळक मुद्दे मेहमूद शेख (३०) असं या अटक आरोपीचं नाव आहे.जोगेश्वरी येथील मेघवाडी परिसरात राहणारी  ७५ वर्षीय महिला २ नोव्हेंबरला सायंकाळी रस्त्याने एकटी घरी निघाली होती.दुर्गंधीचा वास येत असल्याने आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई - जोगेश्वरी येथील मेघवाडी परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. वृद्ध महिलेसमोरून लंगडत गेलेल्या चोराने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. मात्र, वृद्ध महिलेने दिलेल्या माहितीवरून मेघवाडी पोलिसांनी आरोपीला काही तासात जेरबंद केलं. मेहमूद शेख (३०) असं या अटक आरोपीचं नाव आहे.जोगेश्वरी येथील मेघवाडी परिसरात राहणारी  ७५ वर्षीय महिला २ नोव्हेंबरला सायंकाळी रस्त्याने एकटी घरी निघाली होती. एकटी प्रवास करणारी महिला आणि त्यात तिच्या गळ्यातील ऐवज पाहून मेहमूदचे डोळे पांढरे झाले. वृद्धेचे दागिने चोरण्यासाठी तसेच तिला संशय येऊ नये म्हणून त्याने अपंग असल्याचं भासवलं. लंगडत तो महिलेच्या जवळून पुढे गेला. महिलेचं लक्ष नसताना मेहमूदने पाठीमागून येऊन तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी  महिलेने मेघवाडी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलिसांनी संशयित आरोपीबाबत विचारले असता महिलेने त्याचा चेहरा अस्पष्ट दिसला. मात्र, त्याच्या अंगाला घामाचा खूपच दुर्गंध येत होता असं सांगितलं.   पोलिसांनी परिसरातील सर्व भुरट्या चोरांना पकडण्यास सुरूवात केली. त्यावेळी नुकताच तुरुंगातून सुटलेल्या मेहमूदजवळ पोलीस गेले असता त्याच्या संशयित हालचालीवर पोलिसांना संशय येत आला. त्याच्या अंगाला दुर्गंधीचा वास येत असल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेसमोर मेहमूदला हजर करताच महिलेने त्याची ओळख पटवली. तुरुंगामधून सुटल्यानंतर खिशात एक रुपयाही नव्हता. भूकही लागली होती. त्यामुळे चोरी केल्याची कबुली मेहमूदने दिली. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई