शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:33 IST

विजय उर्फ गप्पू आणि कुंती यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच दरम्यान, कुंतीचे जब्बार नावाच्या एका तरुणासोबतही नवीन प्रेमसंबंध जुळले.

उत्तर प्रदेशातीललखनऊमध्ये एक हादरवणारी घटना समोर आली आहे. रहिमाबाद येथील अहिंदर गावात २५ वर्षीय विजय उर्फ गप्पू याची त्याच्याच शेजारी राहणाऱ्या प्रेयसीने, तिच्या पती आणि नवीन प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेले अनैतिक संबंध आणि नंतर त्यात तिसऱ्या व्यक्तीच्या एंट्रीमुळे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय उर्फ गप्पू आणि कुंती यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच दरम्यान, कुंतीचे जब्बार नावाच्या एका तरुणासोबतही नवीन प्रेमसंबंध जुळले. कुंतीचा पती रामभज याला पत्नीच्या विजयसोबतच्या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर, तिने चक्क पतीलाच विश्वासात घेतले आणि विजयला संपवण्याचा कट रचला. यात तिचा नवीन प्रियकर जब्बारही सामील झाला.

'अशी' घडली क्रूर हत्यापोलिसांच्या तपासानुसार, शनिवारी रात्री कुंतीने विजयला तिच्या घरी बोलावले. तिथे तिने त्याला भरपूर दारू पाजली. विजय पूर्णपणे मद्यधुंद झाल्यानंतर कुंतीचा पती रामभज आणि प्रियकर जब्बार तिथे आले. या तिघांनी मिळून विजयचा ओढणीने गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. हत्येनंतर, जब्बार आणि रामभज यांनी विजयचा मृतदेह ओढत नेऊन गावातील एका घराबाहेर फेकून दिला.

पोलिसांनी सोडवली गुंतागुंतबुधवारी रहिमाबाद पोलिसांनी या गुंतागुंतीच्या खून प्रकरणाची यशस्वीपणे उकल केली. पुरावे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुंती, तिचा पती रामभज आणि तिचा नवीन प्रियकर जब्बार यांना अटक केली. 

निरीक्षक आनंद द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंतीचे विजय उर्फ गप्पूसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुंतीचा पती रामभजला हे कळल्यानंतर त्याने याला विरोध केला. याच काळात कुंतीची जब्बारसोबत जवळीक वाढली आणि जब्बार रामभजच्या घरी येऊ लागला. विजयला ही बाब खटकली. यानंतरच कुंतीने पती रामभज आणि प्रियकर जब्बारसोबत मिळून विजयला संपवण्याचा कट रचला.

त्रिकोणी प्रेमातून झालेल्या या निर्घृण हत्येने समाजमन सुन्न झाले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवले असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlucknow-pcलखनऊUttar Pradeshउत्तर प्रदेश