गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:40 IST2025-06-10T16:37:44+5:302025-06-10T16:40:08+5:30

पालकांनी मोबाईलवर गेम खेळण्याची परवानगी नाकारल्याने एका मुलीने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Girl kills herself after parents refuse to give her mobile phone to play games! | गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!

गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!

गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांनी मोबाईलवर गेम खेळण्याची परवानगी नाकारल्याने ९ जून रोजी दुपारी एका १४ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

घरात आढळली बेशुद्धावस्थेत!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ही घटना घडली. मुलीला मोबाईलवर गेम खेळण्याची खूप आवड होती. मात्र, पालकांनी तिला त्या दिवशी मोबाईल वापरण्यास मनाई केली. यावरून ती खूप नाराज झाली. रागाच्या भरात तिने स्वतःला घरात कोंडून घेतले आणि काही वेळाने ती बेशुद्धावस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. आरे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पूर्वेकडील ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.

पालकांनी सांगितलं धक्कादायक कारण 

प्राथमिक चौकशीदरम्यान, मुलीच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, मोबाईलवर गेम खेळायला न मिळाल्याने ती खूप उदास झाली होती. याच त्रासातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे त्यांना वाटते. पालकांनी या घटनेमागे कोणत्याही प्रकारचा संशय किंवा घातपाताचा आरोप केलेला नाही.

पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह सिद्धार्थ पोस्ट-मॉर्टम सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरे पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Girl kills herself after parents refuse to give her mobile phone to play games!