शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:25 IST

पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी करून एका युवतीची ४४ हजाराने फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी या प्रकारची फसवणूक केलेली ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे.

ठळक मुद्देदोन दिवसातील दुसरी घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी करून एका युवतीची ४४ हजाराने फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी या प्रकारची फसवणूक केलेली ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे. इमामवाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
रुचिरा कडबकर या इमामवाडा येथे राहतात. त्या गृहिणी आहेत. त्यांना १४ फेब्रुवारीला मोबाईलवर ७८६६९३९९८५ या क्रमांकावरून कॉल आला. त्याने रुचिरा यांना त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यातून पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी केली. रुचिरा यांनी पेटीएम अकाऊंट नसल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्यास नकार दिला. आरोपींनी त्यांना सांगितले की, केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. असे न केल्यास त्यांचे अकाऊंट ब्लॉक होईल. त्यांनी रुचिराला प्ले स्टोरवरून क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. रुचिराने ते अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यांनी अ‍ॅपमध्ये बचत खाते आणि डेबिट कार्डची माहिती दाखल करण्यास सांगितले. रुचिराने संपूर्ण माहिती त्या अ‍ॅपवर टाकली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ४४ हजार रुपये उडविण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रुचिरा यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. रुचिराला ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला तो हरियाणा येथील असल्याचा संशय आहे. पोलीस क्रमांकाच्या आधारावर आरोपीचा शोध घेत आहेत. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. याच पद्धतीने पेटीएम अकाऊंट ब्लॉक झाल्याची बतावणी करून वीज विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अनिल काशीकर यांची ७५ हजाराने फसवणूक करण्यात आली होती. त्यांनाही सायबर गुन्हेगारांनी अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे उडवले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी