भाईंदरमध्ये हॉटेलच्या आड दारू व गुटखा विकणाऱ्या चालकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:16 PM2021-04-29T19:16:16+5:302021-04-29T19:19:11+5:30

Crime News : भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांनी हॉटेलच्या आड बेकायदा दारू - गुटखा विकणाऱ्यांच्या तक्रारींवरून कारवाई हाती घेतली आहे.

Driver arrested for selling liquor and gutkha at a hotel in Bhayander | भाईंदरमध्ये हॉटेलच्या आड दारू व गुटखा विकणाऱ्या चालकास अटक 

भाईंदरमध्ये हॉटेलच्या आड दारू व गुटखा विकणाऱ्या चालकास अटक 

Next

मीरारोड -  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे शासनाने निर्बंध घातले असताना दुसरीकडे दारू आणि बंदी असलेल्या गुटख्याची वाट्टेल त्या भावात काळ्याबाजाराने विक्री करणाऱ्या एका हॉटेल चालकास भाईंदर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांनी हॉटेलच्या आड बेकायदा दारू - गुटखा विकणाऱ्यांच्या तक्रारींवरून कारवाई हाती घेतली आहे. इंदिरा मार्केट मधील रामभरोसे ढाबा मधून सर्रास बेकायदेशीरपणे दारू आणि बंदी असलेला गुरखा विकला जात असल्याची माहिती पाटील याना मिळाली असता त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

पोलीस पथकाने गस्त दरम्यान सदर रामभरोसे ढाब्यात दारू आणि गुटखा विकला जात असल्याची खात्री करून धाड टाकली असता दारूच्या बाटल्या आणि बंदी असलेला गुटखा साठा सापडला. पोलिसांनी आरोपी किशन फुलचंद गुप्ता (३२) यांना अटक करून गुटखा व दारूसाठा जप्त केला. आरोपीच्या विरुद्ध अन्न व औषध कायदा, भादवी आणि कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले गेले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण कदम करत आहेत.
 

Web Title: Driver arrested for selling liquor and gutkha at a hotel in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.