कल्याणात 20 किलो गांज्यासह दोघांना अटक     

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 16:55 IST2019-09-12T16:53:43+5:302019-09-12T16:55:42+5:30

दोघांना 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Dio Arrested with 20 kilo ganja in Kalyan | कल्याणात 20 किलो गांज्यासह दोघांना अटक     

कल्याणात 20 किलो गांज्यासह दोघांना अटक     

ठळक मुद्देगुरुनाथ सापले (42) आणि नाशिकमधील मंगेश शिवणे (40) या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधीने अटक केली.. ही कारवाई 10 सप्टेंबर रोजी केली असून त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाणे - कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील गोविंदवाडी बायपास येथे गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या गुरुनाथ सापले (42) आणि नाशिकमधील मंगेश शिवणे (40) या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधीने अटक केली. त्यांच्याकडून 20 किलो 382 ग्रम वजनाच्या गांज्यासह एक कार जप्त केली असून गांज्याची किंमत 5 लाख 25 हजार आहे. त्या दोघांना 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.    

कल्याण येथे वाहनातून मोठ्याप्रमाणात गांजा या अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधीचे पोलीस नाईक नामदेव मुंढे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेऊन बाजारपेठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली. त्यांनी प्राथमिक चौकशीत हा गांजा नाशिक येथून विकण्यासाठी आणले असल्याचे सांगितले. ही कारवाई 10 सप्टेंबर रोजी केली असून त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Dio Arrested with 20 kilo ganja in Kalyan