राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:16 IST2025-06-11T19:14:48+5:302025-06-11T19:16:01+5:30

माध्यमांसोबत बोलताना गोविंदने राज कुशवाह आणि सोनम यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा फेटाळल्या आणि राज रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्यासोबत बसूनच सोनमकडून राखी बांधायचा, असे सांगितले...

Did Raj-Sonam try a court marriage Why did they rush to get married to Raja Govind gave the answer | राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर

राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर

राजा रघुवंशी हत्याप्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, राजाची पत्नी सोनम आणि इतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी हत्येचा कट रचणाऱ्या सोनमचा भाऊ गोविंद अचानक राजाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. यावेळी गोविंद राजाच्या आईला भेटला आणि सोनमच्या कृत्याबद्दल क्षमा मागितली आणि त्यांना मिठी मारत ढसाढसा रडला. या भेटीनंतर गोविंदने माध्यमांशी बोलताना, अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

माध्यमांसोबत बोलताना गोविंदने राज कुशवाह आणि सोनम यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा फेटाळल्या आणि राज रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्यासोबत बसूनच सोनमकडून राखी बांधायचा, असे सांगितले. याशिवया ती शिलाँगला गेली, हे आपल्याला माहीत नव्हते. ती आसाममधील गुवाहाटी येथे जाणार असल्याची माहिती होती, असेही गोविंदने सांगितले. यावेळी त्याने मेघालय सरकारवर केलेल्या आपल्या आरोपांबद्दल क्षमाही मागितली. तसेच, सोनम आणि राजने गुणा येथे कोर्ट मॅरेज करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चाही नाकारल्या.

लग्नाची घाई का केली? -
गोविंद म्हणाला, "आम्ही लग्नासंदर्भात कसल्याही प्रकारची घाई केली नाही. मात्र पुढच्या वर्षात कुठलेही मूहुर्त नव्हते. दोन वर्षांपर्यंत कुठलेही मुहूर्त नव्हते, यामुळे थोडी घाई झाली. घाई करण्याचे कारण म्हणजे, 11 मेरोजी शेवटची तारीख होती. त्यानंतर, यांना दोन वर्षांपर्यंत कुठलेही मूहुर्त नव्हते. 

राजासोबतच्या लग्नामुळे नाराज होती सोनम? -
सोनम राजासोबतच्या लग्नामुळे नाराज होती? याप्रश्नाला उत्तर देताना गोविंद म्हणाला, साखरपुड्यानंतर, ती आनंदात होती आणि आमच्या घरात दोन महिने लग्नाची खरेदी सुरू होती. या घरात (राजाच्या घरी) लग्नाची खरेदी एक महिन्यानंतर सुरू झाली असली तरी, आमच्या घरी ही तयारी दोन महिन्यांपासूनच सुरू होती आणि ती अत्यंत आनंदी होती."

Web Title: Did Raj-Sonam try a court marriage Why did they rush to get married to Raja Govind gave the answer