शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

बलिया गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी धीरेंद्र सिंगने आत्मसमर्पणासाठी केला कोर्टात अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 9:58 PM

Ballia Firing : आतापर्यंत या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून यामध्ये धीरेंद्र सिंगचा भाऊ आणि पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती पोलिस स्टेशन परिसरातील दुर्जनपूर गावात सरकारी कोट्याच्या दुकानात गोळ्या घालून जय प्रकाश उर्फ गमा पाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी डीआयजी आजमगड रेंजने ५०-५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बलिया: बलिया (यूपी) प्रकरणातील मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंग यांनी बलिया कोर्टात शरणागतीचा अर्ज दिला आहे. आरोपीने स्थानिक न्यायालयात “सरेंडर अर्ज” दाखल केला आहे. अशा अर्जामुळे आरोपीला संबंधित कोर्टासमोर थेट आत्मसमर्पण करण्याची परवानगी मिळते, त्यानंतर त्याला पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत पाठवायचे की नाही हे ठरवले जाते. आतापर्यंत या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून यामध्ये धीरेंद्र सिंगचा भाऊ आणि पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धीरेंद्र सिंग आणि अन्य पाच जण सध्या फरार आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती पोलिस स्टेशन परिसरातील दुर्जनपूर गावात सरकारी कोट्याच्या दुकानात गोळ्या घालून जय प्रकाश उर्फ गमा पाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी डीआयजी आजमगड रेंजने ५०-५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. एसपी बलिया यांनी फरार आरोपींना यापूर्वी 25-25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

दुर्जनपूर खेड्यात स्वयंसहायता गटांच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी रेशन दुकानांच्या वाटपासाठीच्या या बैठकीचे कामकाज थांबवल्यानंतर जय प्रकाश यांची हत्या झाली. भाजपचे स्थानिक आमदार सुरेंद्र सिंह यांचा धीरेंद्र सिंह हा भाऊ आहे. सुरेंद्र सिंह यांनी भावाला पाठीशी घालताना म्हटले की, ‘जर त्याने स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली नसती, तर त्याच्या कुटुंबातील डझनभर सदस्य आणि सहकारी ठार मारले गेले असते.’ पोलीस प्रशासनाने आमच्या बाजूने प्रथमदर्शनी ‘हलगर्जीपणा’ झाल्याचे मान्य करून रेवती पोलीस ठाण्याचे तीन उपनिरीक्षक आणि सहा कॉन्स्टेबल्सना निलंबित केले आहे.आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्रनरेंद्र प्रतापसिंह यांच्यासह त्यांचा भाऊ व २२-२५ अज्ञात लोकांची नावे प्रथमदर्शनी अहवालात नोंदवण्यात आली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत, असे जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. मुख्य आरोपी फरार आहे. घटनास्थळी दहा पोलीस कर्मचारी होते. ते गुन्हेगारांना वाचवत होते व आम्हाला मारहाण करीत होते. धीरेंद्र प्रताप सिंह हा गोळीबारानंतर पळून गेला व पोलिसांनी त्याला पकडले; परंतु त्यांनी त्याला जवळच्या बंधाºयावर नेऊन सोडून दिले, असे जय प्रकाश पालचे भाऊ तेज प्रताप पाल यांनी शुक्रवारी वार्ताहरांशी बोलताना सांगितले होते.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश