शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! "मी तिला संपवलंय"; वहिनीची हत्या करून दिराने केला तिच्या माहेरी फोन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 21:02 IST

Crime News : पाच वर्षांच्या चिमुकलीच्या डोळ्यासमोर ही भयंकर घटना घडली. तिने देखील पोलिसांना घरामध्ये घडलेला प्रकार सांगितला.

नवी दिल्ली - दिल्लीच्या बुरारी परिसरात नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्याच लहान भावाच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने हत्या केल्यावर वहिनीच्या माहेरी फोन करून याची माहिती दिली. "मी तिला मारून टाकलं" असं सांगितलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतनगरमध्ये ही भयंकर घटना घडली. आरोपीने महिलेवर चाकूने खूप वार केले आहेत. दिराने फोन केल्यानंतर महिलेच्या माहेरची मंडळी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिने हा धक्कादायक प्रकार नेमका कसा घडला याबाबत त्यांना माहिती दिली. महिला घरी एकटी असताना दिर तिथे आला. तो तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. तिने विरोध केला असता तो संतापला आणि त्याने तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. पाच वर्षांच्या चिमुकलीच्या डोळ्यासमोर ही भयंकर घटना घडली. तिने देखील पोलिसांना घरामध्ये घडलेला प्रकार सांगितला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

छोट्या भावाच्या पत्नीची 'त्याने' केली हत्या

नरेंद्र असं या आरोपीचं नाव असून त्याने याआधी देखील काही गुन्हे केले आहेत. तो त्याच्या वहिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा. तसेच नेहमी तिला धमकी देत असे. पण तिने त्याला विरोध केल्यावर त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. याआधी 2019 मध्ये अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात त्याला जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र आता कोरोना काळात तो पॅरोलवर जेलमधून बाहेर आला होता. याच दरम्यान त्याने वहिनीची हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बलात्काराच्या घटनेवर लोकांचा संताप! भररस्त्यात गदारोळ, वाहनांची जाळपोळ; गर्दीवर पोलिसांचा गोळीबार

देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता आसाममध्ये घडली आहे. आसामच्या कछार जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला. मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी केली. तसेच त्यांनी निदर्शने करत परिसरात जाळपोळ केली. वाहनांना आग लावली. कछर जिल्ह्यातील सिलचर येथील आश्रम रोड परिसरात वास्तव्यास असलेली एक अल्पवयीन मुलगी रविवारपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरू होता. अखेर बुधवारी पीडितेचा मृतदेह सिलचरच्या मधुरा घाट येथे आढळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली