शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:54 AM

उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता

ठळक मुद्देउत्पन्नापेक्षा २ कोटी ८५ लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता, पत्नी, दोन मुलांवरही गुन्हेगेल्या ६ ते ७ महिन्यांपासून त्यांची बेहिशोबी मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरु

पुणे : राज्याच्या नगर रचना विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय५३), पत्नी संगिता हनुमंत नाझीरकर (वय ४५), गीतांजली हनुमंत नाझीरकर (वय२३), भास्कर हनुमंत नाझीरकर (वय २३, सर्व रा. स्वप्नशील्प सोसायटी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

नाझीरकर हे सध्या अमरावती येथे नियुक्तीला आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर यांच्या पुण्यातील कोथरुडमधील स्वप्नशील सोसायटीतील घरी तसेच अन्यत्र असलेल्या मालमत्तेवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी छापे घातले असून तेथे तपासणी सुरु आहे. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून त्यांची बेहिशोबी मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरु होती. त्यांच्याविरुद्ध २३ जानेवारी १९८६ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यानच्या कालावधीतील उत्पन्नाचे परिक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांच्याकडे २ कोटी ८५ लाख ३४ हजार २२३ रुपये इतकी बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. त्यात २००२ -२००३ मध्ये १ लाख ४४ हजार ७३७ रुपये, २०१५-१६ मध्ये २ कोटी ४७ लाख २५ हजार ३४५ रुपये, २०१६ -१७ मध्ये ३५ लाख ५२ हजार ६३८ रुपये आणि २०१७ - १८ मध्ये १ लाख ११ हजार ५०३ रुपयांचा समावेश आहे. या बेहिशेबी संपत्तीचे स्पष्टीकरण देण्याची संधी देऊनही ते देऊ शकले नाही. शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात ही मालमत्ता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचारातून कमाविली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुरुवारी सकाळी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सीमा मेंहदळे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नाझीरकर हे पूर्वी पुण्यातील नगर रचना कार्यालयात सहसंचालक म्हणून काम पहात होते. त्यावेळीही त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी