Coronavirus Lockdown : डिप्रेशनचे औषध विक्रीच्या बहाण्याने पठ्ठ्याने विकल्या नशेच्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 11:17 PM2020-05-18T23:17:15+5:302020-05-19T14:43:24+5:30

Coronavirus Lockdown: घर कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये आहे. औषध पुरवण्याच्या बहाण्याने बाहेर पडत असे. 

Coronavirus Lockdown: Drugs sold under the pretext of selling anti-depressant drugs pda | Coronavirus Lockdown : डिप्रेशनचे औषध विक्रीच्या बहाण्याने पठ्ठ्याने विकल्या नशेच्या गोळ्या

Coronavirus Lockdown : डिप्रेशनचे औषध विक्रीच्या बहाण्याने पठ्ठ्याने विकल्या नशेच्या गोळ्या

googlenewsNext
ठळक मुद्दे घंटाघर कोतवाली प्रभारी विष्णू कौशिक यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनस, इस्लामनगर कैलाभट्टा येथील गल्ली नंबर 4 मधील रहिवासी आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सर्वांची अमली पदार्थ पुरवठा करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध लागला आहे.

गाझियाबाद - लॉकडाउनदरम्यान अचानक डिप्रेशनच्या औषधांची विक्री वाढली आहेत. घंटाघर कोतवाली पोलिसांनी पुन्हा एकदा तस्करांना अशाच प्रकारच्या अमली पदार्थांच्या गोळ्यासह अटक केली आहे. त्याच्याकडून 300 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. एका आठवड्यात अशा तस्करांना अटक करण्यात आली आहे. घंटाघर कोतवाली प्रभारी विष्णू कौशिक यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनस, इस्लामनगर कैलाभट्टा येथील गल्ली नंबर 4 मधील रहिवासी आहे. त्याचे घर कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये आहे. औषध पुरवण्याच्या बहाण्याने बाहेर पडत असे. 



कोतवाली प्रभारी म्हणाले की, जे लोक औषध पुरवतात किंवा घरी पोचवतात त्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. डिस्क्रिप्शनवर डिप्रेशनची औषधे देखील घेतली जाऊ शकतात. आरोपी या नियमाचा फायदा घेऊन नवीन बस स्थानकात जात होता आणि २० पट जास्त किंमतीला औषधांचा पुरवठा करत होता. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सर्वांची अमली पदार्थ पुरवठा करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध लागला आहे.

री सोडण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

 

नौदलातील हेरगिरीप्रकरणी आणखी एकाला मुंबईतून अटक

 

लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या 

 


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या तपासात हे उघड झाले आहे की, हे औषध अधिकृत डीलरशिवाय या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत आता अशा औषधांचा साठा कारण्यासाठी दिली जाणारी मंजुरी तपासण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणात औषध विभागाचीही मदत घेतली जाईल.

Web Title: Coronavirus Lockdown: Drugs sold under the pretext of selling anti-depressant drugs pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.