शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 6:27 PM

Sushant Singh Rajput Case : संदीप सिंहच्या अडचणीत होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देमी बॉलिवूड आणि ड्रग्जशी त्याच्या संबंधाबद्दल तपासासाठी सीबीआयकडे त्या तक्रारी पाठवणार असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींची बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यासाठी मला बर्‍याच विनंत्या व तक्रारी आल्या आहेत, त्यानंतर मी बॉलिवूड आणि ड्रग्जशी त्याच्या संबंधाबद्दल तपासासाठी सीबीआयकडे त्या तक्रारी पाठवणार असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे संदीप सिंहच्या अडचणीत होण्याची शक्यता आहे. 

 

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवे वळण येत असतानाच या प्रकरणावरुन राजकारणही तापले आहे. अशातच आता या प्रकरणामध्ये ड्रग्जबाबतीत माहितीनंतर एनसीबीने रियासह अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती, मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोप काही व्हॉ्सअपवरील चॅटवरून समोर आले आहे. ड्रग्जच्या विषयावरुन आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी बॉलिवूडमधील ड्रग्जच्या नेक्ससची चौकशी करावी अशी मागणी केली होती. कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र पाठलं आहे. त्याचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. याच फोटोवर रिप्लाय करताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा अँगलनेही तपास करावा अशी मागणी केली आहे.

राम कदम यांचं ट्विट रिट्विट करत सचिन सावंत यांनी थेट भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना मी विनंती करतो की भाजपा अँगलकडेही लक्ष द्यावे. सीबीआयकडून संदीप सिंहची सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. संदीप हा बायोपीक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता होता. ज्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले,” असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये संदीप सिंह, फडणवीस, चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय एकाच स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखHome Ministryगृह मंत्रालयMaharashtraमहाराष्ट्रCBIगुन्हा अन्वेषण विभागSachin sawantसचिन सावंत