शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उधारीचे पैसे न दिल्याने व्यापाऱ्याचे अपहरण करुन मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 16:40 IST

त्यांनी १७ हजार रुपये व त्यावरील दंड म्हणून ५ लाख रुपयांची मागणी केली़. त्यांना त्याने सायंकाळपर्यंत पैसे देतो, असे सांगितले़...

ठळक मुद्दे१७ हजारांच्या मालाचे ५ लाखांची मागणी : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : ओळखीने उधारीवर घेतलेल्या मालाचे पैसे दिल्यानंतर ते पूर्वीच्या हिशोबात वळते करुन घेऊन १७ हजार रुपयांच्या मालांवर ५ लाख रुपयांची मागणी करुन व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न कर्वेरोडवर घडला आहे़. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका व्यापाऱ्यासह दोघांना अटक केली आहे़.  सुजित जेठमल सोलंकी (वय ३९, रा़ कर्वे रोड, नळस्टॉप) राजु शिवाजी मेटकरी (वय २२, रा़. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी संतोष बाबुलाल बाहेती (वय ४५, रा़ वारजे) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संतोष बाहेती यांचे कर्वे रोडवर दुकान आहे़. त्यांनी रणजित सोलंकी यांच्या ओळखीने बोहरी आळीतील पारस ट्रेडिंग कंपनी या दुकानातून १७ हजार रुपयांच्या रंगपंचमीच्या पिचकाऱ्या उधारीवर घेतल्या होत्या़. एप्रिल २०१९ मध्ये ठरल्याप्रमाणे त्यांनी १७ हजार रुपयांच्या बदल्यात २० हजार रुपये रणजित सोलंकी यांना दिले होते़. परंतु, त्यांचा जुन्या हिशोबातील पैसे बाकी असल्याने त्यांनी ते पैसे पारस ट्रेडिंगला न देता जुन्या हिशोबात वळते करुन घेतले़. त्यामुळे पारस ट्रेडिंगच्या मालकांनी सुजितच्या वडिलांना फोन करुन संतोष बाहेती यांच्याकडून पैसे वसुल करण्याचे काम रणजितचा भाऊ सुजितकडे सोपविले़. त्यानंतर सुजित याने फोन करुन धमकाविण्यास सुरुवात केली़. संतोष बाहेती नेहमीप्रमाणे २२ ऑगस्टला दुपारी ३ वाजता भावाच्या दुकानाबाहेर थांबले असताना सुजित व त्याचे दोन साथीदार आले़. त्यांनी १७ हजार रुपये व त्यावरील दंड म्हणून ५ लाख रुपयांची मागणी केली़. त्यांना त्याने सायंकाळपर्यंत पैसे देतो, असे सांगितले़. त्या तिघांनी संतोष यांना पकडून नळस्टॉप चौकात नेले़. तेथे एका मोटारीत जबरदस्तीने बसवून चांदणी चौकात नेले़. तेथे शिवीगाळ करीत पैशाची मागणी करु लागले़. त्यांनी उरवडे येथील एका शेताजवळ मोटार थांबवून खाली उतरविले़. सुजित याने हॉकी स्टीकने मारहाण केली़. इतरांनी लोखंडी पाईपाने मारहाण करुन एकाने त्यांच्या डोळ्यात बोट घातले़. त्यामुळे त्यांच्या नाकातोंडातून रक्त आले़. त्यांच्या मोबाईल व दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेतली़. पुन्हा मोटारीत बसवून त्यांना सुरीचे उलट्या बाजूने मारहाण करुन पैसे दिले नाही तर खल्लास करुन टाकण्याची धमकी दिली़. त्यानंतर त्यांना पौड रोडवरील कृष्णा हॉस्पिटलजवळ सोडून दिले़. .....दिवसाला डबल पैशांचीमागणीसुजित याने संतोष बाहेती यांना फोन करुन आज पैसे दिले तर १७ हजार रुपये़ आज दिले नाही तर उद्या ३४ हजार रुपये असे प्रत्येक दिवशी डबल पैशाची मागणी करुन लागला़ त्यानंतर त्यान फोन करुन १ आॅगस्ट रोजी १ लाख ३० हजार रुपये व १० आॅगस्टला १ लाख ३० हजार रुपये दे मग हिशोब पूर्ण होईल, असे फोन करुन सांगितले़ बाहेती १ व १० तारखेला त्याच्या मागणीप्रमाणे पैसे देऊ शकले नाहीत़ म्हणून तो त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करुन लागला होता़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरण