बुलढाण्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ समोर; चुलत भावासोबतच्या प्रेमामुळे बापानेच केली विवाहित मुलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 19:24 IST2026-05-18T19:19:53+5:302026-05-18T19:24:00+5:30

बुलढाण्यात सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.

Buldanha Shockem Father and Brother Arrested After Severed Head Found in Field | बुलढाण्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ समोर; चुलत भावासोबतच्या प्रेमामुळे बापानेच केली विवाहित मुलीची हत्या

बुलढाण्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ समोर; चुलत भावासोबतच्या प्रेमामुळे बापानेच केली विवाहित मुलीची हत्या

Buldhana Crime: २६ एप्रिल रोजी बुलढाण्यात एका शेतात एक छिन्नविच्छिन्न मृतदेह पडल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तिथले दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला. एका तरुणीचे शीर धडावेगळे करण्यात आले होते. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे डोके आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी टाकून ते अर्धवट जाळण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती आणि आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

१२ दिवसांचा थरार आणि बुरहानपूर कनेक्शन

बुलढाणा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आजूबाजूच्या जळगाव, अमरावती, अकोला या जिल्ह्यांसह थेट मध्य प्रदेशात पोलिसांची पथके रवाना केली. या सर्व भागांतील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी सुरू करण्यात आली. तब्बल १२ दिवस तपास केल्यानंतर, पोलिसांना मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार सापडली. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय बापुराव नथु काळमेकर यांनी त्यांची २४ वर्षीय मुलगी शिवानी २५ एप्रिलपासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार दिली होती.

चुलत भावावरील प्रेम बेतले जीवावर

संशयाच्या आधारे बुलढाणा पोलिसांनी तक्रारदार बापुराव आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. पोलिसांच्या खाक्या दाखवताच  बापाने स्वतःच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिवानीचे लग्न महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील प्रकाश भिलावेकर यांच्याशी झाले होते. मात्र, लग्न झालेले असतानाही शिवानीचे तिच्याच एका चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी तिला या नातेसंबंधातून बाहेर पडण्यासाठी अनेकदा समजावले पण शिवानी चुलत भावासोबतचे नाते तोडण्यास तयार नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या बापाने टोकाचे पाऊल उचलले.

२५ एप्रिल रोजी बापुरावने शिवानीच्या डोक्यात बांबूच्या मोठ्या काठीने जोरदार प्रहार केला, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, बापुराव आणि त्याच्या मुलाने शिवानीचा मृतदेह मोटारसायकलवर मधोमध बसवून मध्य प्रदेशातून थेट महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका दुर्गम गावात आणला. तिथे त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे शीर धडावेगळे केले आणि मृतदेह शेतात ठेवून पेटवून दिला. मात्र, मृतदेह पूर्णपणे न जळाल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, बुलढाणा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
 

Web Title : बुलढाणा हत्याकांड रहस्य खुला: प्रेम संबंध के चलते पिता ने बेटी को मार डाला

Web Summary : बुलढाणा में एक महिला की हत्या का रहस्य 12 दिन बाद खुला। पिता ने विवाहित होने के बावजूद चचेरे भाई के साथ प्रेम संबंध के कारण बेटी की हत्या करने की बात कबूल की। उसने सबूत नष्ट करने के लिए शव को खेत में ठिकाने लगा दिया।

Web Title : Buldhana Murder Mystery Solved: Father Kills Daughter Over Love Affair

Web Summary : A Buldhana woman's murder was solved after 12 days. Her father confessed to killing her due to her affair with her cousin, despite being married. He disposed of the body in a field to destroy evidence.