सूरत हादरलं! प्रसिद्ध बिल्डरने स्वतःवर झाडली गोळी; ४ दिवसांनंतर होतं मुलीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 14:50 IST2026-02-01T14:49:41+5:302026-02-01T14:50:36+5:30

गुजरातची 'डायमंड सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

builder tushar ghelani attempts end life surat gujarat | सूरत हादरलं! प्रसिद्ध बिल्डरने स्वतःवर झाडली गोळी; ४ दिवसांनंतर होतं मुलीचं लग्न

फोटो - आजतक

गुजरातची 'डायमंड सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध रिअल इस्टेट उद्योजक आणि 'जॉली ग्रुप'चे सर्वेसर्वा तुषार घेलाणी यांनी रविवारी रात्री आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नाच्या तयारीत मग्न होतं. सध्या त्यांना गंभीर अवस्थेत महावीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिटीलाईट परिसरातील तुषार घेलाणी यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे २ च्या सुमारास घडली. तुषार यांनी आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर केल्याचं सांगितलं जात आहे. शांतता भंग करणाऱ्या गोळीचा आवाज ऐकून जेव्हा घरातील लोक खोलीच्या दिशेने धावले, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तुषार घेलाणी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. त्यांची प्रकृती पाहता त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्याची तयारीही सुरू आहे. या अपघातातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी तुषार घेलाणी यांच्या मुलीचे लग्न होणार होतं. आजपासूनच लग्नाचे सुरुवातीचे विधी आणि उत्सव सुरू होणार होते. घरात मंडप सजला होता, पाहुण्यांचे येणं सुरू झालं होतं. परंतु या एका घटनेने सर्व काही बदलून टाकलं. 

घरातील सजावट आणि लग्नाचा मंडप आता हटवला जात आहे. जे पाहुणे शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचत आहेत, त्यांना या घटनेची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यात वापरलेली रिव्हॉल्व्हर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. प्राथमिक तपासात या आत्मघातकी पावलांमागे 'कौटुंबिक कलह' असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र पोलीस अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. पोलीस सध्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत आहेत.

Web Title : सूरत में सनसनी: बेटी की शादी से पहले बिल्डर ने खुद को गोली मारी

Web Summary : सूरत के बिल्डर, तुषार गेलानी ने बेटी की शादी से पहले आत्महत्या का प्रयास किया, जिससे परिवार सदमे में है। उनकी हालत गंभीर है। पारिवारिक कलह का संदेह है। शादी की तैयारी रोक दी गई है।

Web Title : Surat Shaken: Builder Shoots Self Before Daughter's Wedding

Web Summary : Surat builder, Tushar Ghelani, attempted suicide before his daughter's wedding, shocking the family. He is in critical condition. Family discord is suspected as the motive. Wedding preparations are halted.