Brother sexually assaulted sister 100 times and ... | नात्याला काळिमा! भावाने बहिणीचे केले १०० वेळा लैंगिक शोषण अन्...

नात्याला काळिमा! भावाने बहिणीचे केले १०० वेळा लैंगिक शोषण अन्...

ठळक मुद्देआरोपी भावाविरूद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोपात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आईवडिलांना या गोष्टीची माहिती नव्हती की त्यांची मुलगी गरोदर आहे.

जेफरसन सिटी - १७ वर्षांच्या भावाने आपल्या ११ वर्षीय सख्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलगीला दिवस गेले आणि ती गरोदर राहिली. ११ वर्षांच्या बलात्कार पीडितने आपल्या घराच्या बाथटबमध्ये प्रिमॅच्युअर बाळाला जन्म दिला. हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील सेंट चार्लेस, मिसुरी शहरात घडला आहे.

आरोपी भावाविरूद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोपात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या शिवाय आई-वडिलांविरूद्धही आपल्या मुलांची योग्यपद्धतीने देखभाल न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. हा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा आई-वडील ११ फेब्रुवारीला एका नवजात बालकाला घेऊन मिसुरच्या सेंट जोसेफ हॉस्पिटलमध्ये आले.
सुरूवातील पालकांनी हॉस्पिटल खोटं सांगितले की, हा मुलगा त्यांचा आहे. वडिलांच्या एक्स गर्लफ्रेंडने हा मुलगा त्यांच्या घराच्या बाहेर सोडून दिला आहे. त्यानंतर चौकशी केल्यानंतर सांगितले की, हे नवजात बाळ त्यांच्या मुलीचे आहे. घराच्या बाथटबमध्ये तीने जन्म दिला आहे. तसेच बाळाचे वडील हा त्यांचाच मुलगा आहे.

आईवडिलांना या गोष्टीची माहिती नव्हती की त्यांची मुलगी गरोदर आहे. तसेच भाऊ तिच्यावर बलात्कार करत होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्या आरोपी मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने कबुल केले की, त्याने बहिणीचा १०० वेळा लैंगिक छळ केला. त्याला माहित नव्हतं की गरोदर राहिली होती. पोलिसांनी सांगितले की, बाळ हे प्रिमॅच्युअर आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पालकांनी सांगितले की, त्यांचे दोन्ही मुलं एका नातेवाईकाकडे राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयीतांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले होते. पुरुषाला १ लाख डॉलर, महिलेला १० हजार डॉलर तर अल्पवयीन मुलास ३ लाख डॉलरच्या जामिनावर सोडण्यात आले, अशी माहिती एनबीसी न्यूजने दिली आहे. 

English summary :
Girl(11) gave birth to baby allegedly fathered by brother; he and parents are charged.

Web Title: Brother sexually assaulted sister 100 times and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.