घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:55 IST2026-05-06T11:55:28+5:302026-05-06T11:55:28+5:30
सुरुवातीला तपासात घरमालकाने आपण या दोघांना ओळखत नाही असं सांगितले होते. मात्र त्यानंतर कॉल डिटेल्स, युवतीच्या जबाबानंतर संपूर्ण कहाणीच बदलली.

घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
नोएडा - शहरातील रघुनाथपूर येथे सोमवारी तिसऱ्या मजल्यावरून युवक-युवती खाली कोसळले. त्यात युवकाचा मृत्यू झाला तर युवती गंभीर जखमी झाली. या घटनेला आता नवे वळण लागलं आहे. सुरुवातीला हे आत्महत्या अथवा चोरी प्रकरण असावे असा पोलिसांना संशय होता परंतु आता नातेवाईकांनी या दोघांवर बंधक बनवून थर्ड डिग्री टॉर्चर केल्याचा आणि उडी मारण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
मृत युवकाच्या वडिलांनी म्हटलं की, घरमालकाने अनैतिक संबंधाच्या संशयावरून षडयंत्र रचत या दोघांना बोलावले आणि रात्रभर हॉकीने त्यांना बेदम मारहाण केली असा आरोप केला आहे. जखमी युवतीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. याबाबत मृत युवकाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करून पोस्टमोर्टम रिपोर्ट आणि जखमी युवतीच्या जबाबानंतर पुढची कार्यवाही करू असं पोलिसांनी म्हटलं आहे. घरमालकाची बायको ही युवकाची कॉलेज फ्रेंड होती. पतीला ही बाब समजताच त्याने युवक आणि त्याच्या मैत्रिणीला बोलावले आणि बंधक बनवले असा आरोप आहे.
युवकाने पतीची माफी मागितली, त्याशिवाय नंबर बदलण्यासाठी सिमकार्डही तोडले. तरीही आरोपीने युवक आणि त्याच्या मैत्रिणीला रात्रभर बेदम मारहाण केली. आरोपीच्या जाचातून सुटण्यासाठी या दोघांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात युवकाचा मृत्यू झाला. सुरुवातीला तपासात घरमालकाने आपण या दोघांना ओळखत नाही असं सांगितले होते. मात्र त्यानंतर कॉल डिटेल्स, युवतीच्या जबाबानंतर संपूर्ण कहाणीच बदलली. पोलिसांनी युवक आणि युवतीचे सीडीआर तपासले आहेत. घटनास्थळी लागलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहेत. युवतीचा पुन्हा जबाब घेतला जाणार आहे.
दरम्यान, तपासात काही मोबाईल नंबर संशयाच्या घेऱ्यात आले आहे. काही लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. याच्या आधारे घरमालक गजराज यांचा मुलगा आणि सून संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. युवक आणि युवतीच्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स आणि घटनास्थळाच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असं नोएडाच्या एडीसीपी मनीषा सिंह यांनी सांगितले.