बापरे! ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 04:37 PM2021-07-28T16:37:24+5:302021-07-28T16:43:25+5:30

Two Child Suicide Attempt Mobile Game : गेमच्या नादामुळे मुलं वेगवेगळे कारनामे करत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

bihar gopalganj two child suicide attempt mobile game | बापरे! ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या

बापरे! ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या

googlenewsNext

नवी दिल्ली - लहान मुलांना ऑनलाईन गेमचं अक्षरश: वेड लागलं आहे. या गेमच्या नादामुळे मुलं वेगवेगळे कारनामे करत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून दोन मुलांनी टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या गोपाळगंजमध्ये मोबाईलवर गेम खेळण्यामुळे झालेल्या वादातून दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. उच्चकागाव आणि मांझागाव या दोन ठिकाणी ही हैराण करणारी घटना घडली आहे. 

मुलं सतत ऑनलाईन गेम खेळत असल्याने वडिलांनी त्यांना रोखलं म्हणून मुलांनी आत्महत्या केली. पण सुदैवाने मुलांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. उच्चकागावातील एका 12 वर्षीय मुलाला त्याचे वडील ऑनलाईन गेममुळे ओरडले होते. त्यामुळे मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र वेळीच कुटुंबीयांनी हा प्रकार पाहिला आणि तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी मुलाला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

तर दुसरीकडे मांझागडमधील रामनगर गावातील मिलोटन चौधरींच्या घरी देखील अशीच घटना घडली. चौधरी यांनी आपला 14 वर्षीय मुलगा राजन कुमार याला ऑनलाईन गेम खेळताना पाहिलं आणि त्यानंतर ते त्याला त्यावरून ओरडले. त्यामुळे नाराज झालेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. येथे देखील नातेवाईकांच्या लक्षात ही घटना वेळीच आल्याने त्यांनी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! फेसबुकवरील मैत्री पडली महागात; Video कॉलने उद्ध्वस्त झालं आयुष्य, तरुणीवर आत्महत्येची वेळ

उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका तरुणीला फेसबुकवर झालेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. एका Video कॉलने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तरुणीवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. फेसबुकवरच्या मित्राने तरुणीला गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. व्हिडीओ कॉल करून त्याने तिचे काही आक्षेपार्ह स्क्रिनशॉट काढले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यामुळे तरुणीसमोर त्याचा खरा चेहरा आला. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: bihar gopalganj two child suicide attempt mobile game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.