भयंकर! फेसबुकवरील मैत्री पडली महागात; Video कॉलने उद्ध्वस्त झालं आयुष्य, तरुणीवर आत्महत्येची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:12 PM2021-07-27T16:12:41+5:302021-07-27T16:27:12+5:30

Crime News : फेसबुकवरच्या मित्राने तरुणीला गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवलं होतं.

Crime News up youth friends mp girl on facebook and started blackmailing | भयंकर! फेसबुकवरील मैत्री पडली महागात; Video कॉलने उद्ध्वस्त झालं आयुष्य, तरुणीवर आत्महत्येची वेळ

भयंकर! फेसबुकवरील मैत्री पडली महागात; Video कॉलने उद्ध्वस्त झालं आयुष्य, तरुणीवर आत्महत्येची वेळ

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका तरुणीला फेसबुकवर झालेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. एका Video कॉलने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तरुणीवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. फेसबुकवरच्या मित्राने तरुणीला गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. व्हिडीओ कॉल करून त्याने तिचे काही आक्षेपार्ह स्क्रिनशॉट काढले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यामुळे तरुणीसमोर त्याचा खरा चेहरा आला. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. 

तरुणीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा लखनऊचा रहिवासी आहे. बेलबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणीची 2020 मध्ये लखनऊ येथील शिवणकाम करणाऱ्या 21 वर्षीय शादाब उर्फ मोहम्मद याच्याशी ओळख झाली. शादाब लखनऊपासून 70 किमी दूर राहत आहे. आरोपीने स्वत:विषयीची खरी माहिती न देता तरुणीसोबत मैत्री केली. सुरुवातीला ते सोशल मीडियावर चॅट करीत होते. त्यानंतर ते मोबाईलवरुन बोलू लागले. 

आरोपी शादाबने काही दिवसांपूर्वी तरुणीला व्हिडीओ कॉल केला होता. त्याने तरुणीला फसवून व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट काढले. यानंतर पैसे दिले नाही तर हे फोटो व्हायरल करेल अशी धमकीही देऊ लागला. सत्य समोर आल्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्यानंतर शादाबने ते फोटो तरुणीच्या नातेवाईकांना पाठवले. ज्यानंतर घरात मोठा गोंधळ झाला. यानंतरही तो तरुणीला धमकी देत होता. पैसे दिले नाही तर सर्व फेसबुक फ्रेंड्सना हे फोटो शेअर करेन अशी धमकी दिली होती.

शादाबकडून सुरू असलेलं ब्लॅकमेलिंग आणि ते फोटो कुटुंबीयांना पाठविल्यानंतर झालेल्या वादामुळे तरुणी खूप निराश झाली होती. 4 दिवसांपूर्वी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी एक टीम लखनऊला पाठवली. येथे आरोपीचा IP एड्रेस ट्रॅक करून त्याला पकडण्यात यश आलं. चौकशीमधून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 10 वी पास आहे. पुढील शिक्षण घेण्याऐवजी त्याने शिवणकाम सुरू केलं. आरोपीला जबलपूर कोर्टात हजर केल्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News up youth friends mp girl on facebook and started blackmailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.