शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

घातपात की अपघात! दौंडमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 9:55 PM

Deadbody Found : हा घातपात की अपघात याचा देखील तपास दौंड पोलिसांनी सुरू केला आहे.

ठळक मुद्देदिपमळा समोरून डिफेन्स कॉलनीकडे जाणाऱ्या दुभाजक रस्त्यावर म्हसोबा मंदिरासमोर आज सकाळी हा मृतदेह आढळून आला.

दौंडमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक तपासानुसार वाहन अपघातामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.  हा घातपात की अपघात याचा देखील तपास दौंड पोलिसांनी सुरू केला आहे.

दिपमळा समोरून डिफेन्स कॉलनीकडे जाणाऱ्या दुभाजक रस्त्यावर म्हसोबा मंदिरासमोर आज सकाळी हा मृतदेह आढळून आला. घटनेच्या एक दिवसआधी ही व्यक्ती रस्त्याने बडबड करत फिरत असल्याचे काही नागरीकांनी पोलिसांना सांगितले आहे. या अज्ञात मृत व्यक्तीचे वय ३८ ते ४० असून त्याच्या अंगावर फक्त अंडरवेअर आणि एक टॉवेल होता. त्याच्या डोक्याला जखम आहे. तोंडावर रक्ताचे डाग असून खांद्यावर, पायाला, हाताच्या कोपऱ्यांना देखील जखमा पोलिसांना आढळून आल्या आहेत.

ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्या परिसरात टवाळखोर आणि तळीरामांची रेलचेल असते. रात्रीच्या सुमारास येथील रस्ता सामसूम असतो. पोलिसांनी घटस्थळाच्या आजूबाजूला संशयित बाबींची पाहणी केली. या घटनेची माहिती मिळताच दौंड ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे, विजय वाघमारे यांनी घटस्थळी भेट दिली. मृतदेह ताब्यात घेवून दौंड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू