बाहेर प्रेयसी, घरात पत्नीचा लठ्ठपणा! यूट्यूबरकडून ८० हजारांचे विष घेऊन पतीने रचला मोठा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:47 IST2026-05-06T18:44:56+5:302026-05-06T18:47:18+5:30

पत्नीच्या लठ्ठपणामुळे वैतागलेल्या पतीने तिची हत्या करण्यासाठी मोठा कट रचल्याचे समोर आलं आहे.

Andhra Pradesh Man Murders Wife Over Obesity and Extramarital Affair Poison Purchased via YouTuber | बाहेर प्रेयसी, घरात पत्नीचा लठ्ठपणा! यूट्यूबरकडून ८० हजारांचे विष घेऊन पतीने रचला मोठा कट

बाहेर प्रेयसी, घरात पत्नीचा लठ्ठपणा! यूट्यूबरकडून ८० हजारांचे विष घेऊन पतीने रचला मोठा कट

Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या लठ्ठपणाला कंटाळलेल्या आणि बाहेर अनैतिक संबध सुरु असलेल्या एका पतीने अत्यंत थंड डोक्याने पत्नीची हत्या केली. महत्त्वाचे म्हणजे, हत्येसाठी लागणारे विष त्याने एका यूट्यूबरकडून तब्बल ८० हजार रुपयांना विकत घेतले होते.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रीपल्ली किरण आणि भद्रीपल्ली पद्मजा (३१) यांच्या संसारात गेल्या काही काळापासून वाद सुरू होते. किरणला आपल्या पत्नीच्या लठ्ठपणाचा आणि तिला आवडत असलेल्या जंक फूडचा प्रचंड तिरस्कार होता. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत असत.

अनैतिक संबंध आणि हत्येचा कट

किरणचे हैदराबादमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, ज्यामुळे पती-पत्नीमधील दुरावा अधिकच वाढला होता. आपल्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी किरणने पद्मजाला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने सोशल मीडियावर असे विष शोधण्यास सुरुवात केली, ज्याचा सुगावा कोणालाही लागणार नाही. या दरम्यान त्याचा संपर्क एका यूट्यूबरशी झाला, ज्याने त्याला ८० हजार रुपयांच्या मोबदल्यात विषारी पदार्थ विकले.

विष देऊन आणि उशीने तोंड दाबून हत्या

२९ एप्रिलच्या रात्री किरणने ते विष मिठाईमध्ये मिसळून पद्मजाला खाऊ घातले. विषामुळे ती कोसळली, पण तरीही तिचा श्वास सुरू होता. ती जिवंत असल्याचे पाहून किरणने क्रूरतेची सीमा गाठली आणि उशीने तिचे तोंड दाबून तिचा जीव घेतला. ३० एप्रिलच्या पहाटे हा सर्व प्रकार घडला.

अपघाताचा बनाव फसला

हत्या केल्यानंतर किरणने हा प्रकार अपघाती असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पद्मजा बेडवरून खाली पडली आणि बेशुद्ध झाली, असे त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर संशय बळावला.

पोलिसांचा तपास आणि कारवाई

पद्मजाचे वडील राजा कुल्लाई यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला. शवविच्छेदन अहवालात शरीरात विषारी पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी किरणला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणात किरणच्या प्रेयसीचा हात नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असले तरी, ज्या यूट्यूबरने विष विकले, तो सध्या फरार आहे. पोलीस या अदृश्य आरोपीचा शोध घेत असून त्याचे फोन लोकेशन ट्रॅक केले जात आहे.

Web Title : पत्नी के मोटापे से तंग पति ने यूट्यूबर से जहर खरीदकर हत्या की

Web Summary : आंध्र प्रदेश में एक व्यक्ति ने पत्नी के मोटापे और अवैध संबंध के चलते यूट्यूबर से 80 हजार रुपये में जहर खरीदकर उसे मार डाला। उसने दुर्घटना दिखाने की कोशिश की, लेकिन पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद पुलिस ने पूछताछ में गुनाह कबूल कर लिया।

Web Title : Husband Kills Wife Over Weight, Buys Poison from YouTuber

Web Summary : Andhra Pradesh man, frustrated with his wife's weight and affair, poisoned her after buying poison from a YouTuber for ₹80,000. He initially tried to fake an accident but confessed when confronted by police after autopsy reports revealed foul play.