'कारवाई हवी तर माझ्यासोबत झोप, दोघे एकाच समाजाचे...'; बलात्कार पीडितेकडे अलीगडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:28 IST2026-03-20T12:27:07+5:302026-03-20T12:28:28+5:30

Aligarh Muslim Constable Case: अलीगडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने बलात्कार पीडितेकडे न्यायाच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केली. सविस्तर वाचा.

Aligarh Muslim Constable Case: 'If you want action, sleep with me, we are both from the same community...'; Police constable in Aligarh demands physical pleasure from rape victim | 'कारवाई हवी तर माझ्यासोबत झोप, दोघे एकाच समाजाचे...'; बलात्कार पीडितेकडे अलीगडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची शरीरसुखाची मागणी

'कारवाई हवी तर माझ्यासोबत झोप, दोघे एकाच समाजाचे...'; बलात्कार पीडितेकडे अलीगडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची शरीरसुखाची मागणी

उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये पोलीस दलाला लज्जास्पद वाटेल अशी एक घटना समोर आली आहे. एका बलात्कार पीडितेची मदत करण्याऐवजी, एका पोलीस कॉन्स्टेबलने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. "जर तुला न्याय हवा असेल आणि आरोपीवर कारवाई करायची असेल, तर तुला माझ्यासोबत झोपावे लागेल," असे निर्लज्ज विधान या पोलिसाने केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मुस्लिम समाजाची होती. एका बलात्कार प्रकरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात चकरा मारत होती. या प्रकरणाचा तपास किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या बहाण्याने संबंधित कॉन्स्टेबलने तिला गाठले. पीडितेने आरोप केला आहे की, आरोपी पोलिसाने तिला एकांतात बोलावून अश्लील मागणी केली. न्याय मिळवून देण्याच्या बदल्यात त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधांची अट घातली. तसेच मी देखील मुस्लिम आहे, तू देखील मुस्लिम आहेस. तुला कारवाई व्हावी असे वाटत असेल तर माझ्यासोबत झोप, असे त्याने तिला म्हटले होते.

पीडितेने गाठले वरिष्ठ अधिकारी
पोलीस कर्मचाऱ्याच्या या वागणुकीमुळे हादरलेल्या पीडितेने धीर एकवटून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तिने या संपूर्ण प्रकरणाची कैफियत मांडली असून आरोपी पोलिसाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून अलीगड पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास त्या कॉन्स्टेबलवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title : अलीगढ़: बलात्कार पीड़िता से पुलिसकर्मी ने कार्रवाई के लिए यौन संबंध मांगे

Web Summary : अलीगढ़ में एक पुलिस कांस्टेबल पर बलात्कार पीड़िता से मामले में कार्रवाई के बदले यौन संबंध मांगने का आरोप है। पीड़िता ने वरिष्ठ अधिकारियों से शिकायत की, जिसके बाद जांच शुरू हो गई है। दोषी पाए जाने पर कार्रवाई का वादा किया गया है।

Web Title : UP Cop Demands Sex from Rape Victim for Action: Report

Web Summary : In Aligarh, a police constable allegedly demanded sexual favors from a rape victim in exchange for action on her case. The victim, a Muslim woman, reported the constable's demand to senior officers, prompting an investigation. Action promised if found guilty.