शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या आरोपाखाली ४ जण जेलमध्ये बंद; १८ महिन्यांनी मृत महिला परतली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:20 IST

या मृत महिलेचे कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ४ जणांवर कथित हत्येचा आरोप होऊन त्यांना अटक करण्यात आली होती

झाबुआ - मध्य प्रदेशात अजब गजब प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी एक महिला जिचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाल्याचं मानलं होतं. अचानक ती परत आली आहे. ही महिला परत आल्याने तिचं कुटुंब, शेजारी आणि पोलीसही हैराण झालेत. या कुटुंबाने तिच्यावर अंत्यसंस्कारही केले होते. विशेष म्हणजे या महिलेच्या कथित हत्या प्रकरणी ४ जण जेलमध्ये बंद आहेत. ही महिला मंदसौरच्या नवाली गावात राहत होती. ती पुन्हा आलीय यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही. महिला परतल्यानंतर तिच्या वडिलांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत त्यांना ही बाब कळवली. 

या घटनेबाबत सागर पोलीस स्टेशन अधिकारी तरूणा भारद्वाज म्हणाल्या की, ही महिला मंदसौरहून शाखरूख नावाच्या एका व्यक्तीसोबत निघून गेली होती. २ दिवसानंतर कोटा इथं त्याला आणखी एका व्यक्तीकडे सोपवले गेले. तेव्हापासून ती कोटा येथे राहत होती. परंतु दीड वर्षाने ती त्या माणसांच्या तावडीतून पळून घरी परतण्यास यशस्वी ठरली आहे. या महिलेने तिची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्डासारखे अन्य कागदपत्रे दाखवली. हे प्रकरण आम्ही झाबुआच्या थांदला पोलीस स्टेशनला सोपवले आहे ज्यांनी या महिलेच्या हत्येचा तपास केला होता असं त्यांनी सांगितले.

महिलेला २ मुले...

या महिलेला २ मुले असून दीड वर्षांनी ती मुलांना भेटली. महिला परत जिवंत आल्याने कुटुंबाला आनंद झाला आहे. ती थांदला पोलीस स्टेशनलाही गेली. तिचे वडील रमेश यांनी २०२३ साली एका भयंकर अपघातात मृत झालेल्या महिलेची ओळख त्यांची मुलगी असल्याचं केले होते. या मृतदेहावर तिच्या नावाचा टॅटू होता आणि दंडावर काळा धागाही होता. त्यामुळे ही माझीच मुलगी आहे असं वडिलांनी पोलिसांना सांगितले होते. 

४ जणांवर हत्येचा आरोप

या मृत महिलेचे कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ४ जणांवर कथित हत्येचा आरोप होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.  त्यात इमरान, शाहरूख, सोनू आणि एजाज यांचा समावेश असून गेली दीड वर्ष हे जेलमध्ये आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह कुटुंबाला सोपवला. त्यानंतर कुटुंबाने तिच्यावर विधी परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. आता ती महिला परत आल्याने पोलीस आणि कुटुंब दोन्ही हैराण झाले. पोलीस आता या प्रकरणाची पुन्हा चौकशी करत असून महिला तस्करीचं हे नेटवर्क आहे का याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी