शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

बारामती उपविभागातील २४ गुन्हेगारांवर सहा महिन्यांसाठी तडीपार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:51 IST

२४ आरोपींवर बारामती व इंदापूर तालुक्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एकुण २४ आरोपींना तडीपार करण्याचे दिले आदेश

बारामती (सांगवी) : बारामती उपविभागातील खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारीमारी, गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी अशा गंभीर गुन्ह्याखालील एकुण २४ आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.

बारामती व इंदापूर तालुक्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींना तडीपार करण्या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे प्रस्ताव प्राप्त आला असता, त्यांनी सदरच्या प्रस्तावांवाबत शहानिशा व चौकशी करून आरोपींना तडीपार करण्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक पाटील यांनी याबाबत शहानिशा करून एकुण २४  आरोपींना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय उर्फ आकाश यापू जाधव,  रविंद्र उर्फ पप्पू तुकाराम मदने, ( दोघे  रा. मळद ता.बारामती ) यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड तसेच अहमदनगर जिल्हयातील कर्जत, सोलापुर जिल्हातील माढा,करमाळा व अकलुज या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. बारामती तालूका पोलीस ठाण्याखालील आरोपी दिपक तानाजी चव्हाण, ( ता.बारामती ) तुपार उर्फ जंब्या अंबाजी खोमणे, किरण शंकर खोमणे, राजन बाळासाहेब पैठणकर, सचिन विलास खरात, अमोल भारत जगताप, ऋपीकेश हनुमंत चव्हाण, संग्राम राजेंद्र चव्हाण, राहूल बाळासाहेब जाधव, (सर्व रा. माळेगांव, ता.बारामती ) मनोज बाळासाहेब पाटोळे, रा. शिरवली,( ता. बारामती ) यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड, पुरंदर तसेच सातारा जिल्हयातील फलटण व सोलापुर जिल्हातील माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आरोपी बबलू उर्फ सौरभ मनोहर पवार, रा. रणगाव ( ता. इंदापुर ) प्रितम सुरेश जाधव, सचिन अर्जुन गोसावी, अनिकेत उर्फ बापू शिवाजी रणमोडे, इन्नू सरहिम नशिद पठाण रा. रणगाव,  संदिप रामभाऊ गोसावी रा. रणगाव,  महेश महादेव अर्जुन रा.चिखली ( ता. इंदापुर ) कुपदिप उबाळे रा .वालचंदनगर ( ता.इंदापूर ) तेजस शिवाजी जाधव रा.कळंब ( ता.इंदापूर ) नितीन हरिभाऊ भोसले रा.लासुर्णे ( ता.इंदापूर ) सचिन शिवाजी अर्जुन यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड तसेच सोलापुर जिल्हातील माढा व माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. तर  वालचंदनगर पोलीस स्टेशनमधील आरोपी कुलदीप पोपट रक्टे, (रा.रणगाव) ,पिंटू उर्फ दिपक औदुंबर, नितीन हरिभाऊ भोसले, रा.लासूर्णे ( ता.इंदापूर )  यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड तसेच सोलापुर जिल्हातील माढा व माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी