शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मी स्टाईल लावला गंडा, ग्राहकांच्या सोन्याचा गैरवापर; बँक मॅनेजरनं जमवलं कोट्यवधीचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:11 IST

बँकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्कालीन बँक मॅनेजर अमित कुमार, अनंत चौधरी आणि बँकेचे अधिकारी संतोष कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

राजस्थानच्या नवलगड जिल्ह्यातील पंजाब नॅशनल बँकेतील ६.५० कोटींचा गोल्ड घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा एखाद्या सिनेमातील कथानकाप्रमाणे हळूहळू उघडकीस आला. त्यात बँक मॅनेजर अमित कुमार जांगिडने केवळ ग्राहकांचा विश्वासघात केला नाही तर त्यांच्या सोन्याचा गैरवापर करून स्वत:कडे घबाड जमावले आणि त्याच्या खासगी संपत्तीत कोट्यवधीचे साम्राज्य उभे केले.

या गोल्ड घोटाळ्यातून आरोपी बँक मॅनेजरने महागडी जमीन खरेदी केली. डेअरी प्लांट उभारले. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या शेकडो ग्राहकांमध्ये चिंता पसरली आहे. ज्यांनी कर्जाच्या बदल्यात बँकेत सोने गहाण ठेवले आहे. माहितीनुसार, बँकेच्या स्ट्राँग रुममध्ये कर्ज घेतलेल्या ग्राहकांचे सोने सुरक्षित ठेवण्यात आले होते. तपासात यातील ७३ पाकिटात खऱ्या सोन्याऐवजी बनावट खोटे सोने ठेवले होते. तर ३ पाकिटांमधील सोन्याचे वजन कमी आढळले तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला.

बँकेच्या सुरुवातीच्या तपासात एकूण ४ हजार १९८ ग्रॅम सोने कमी आढळले. त्याचे बाजारभाव जवळफास ६.५० कोटी इतके होते. या चोरीचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. बँकेच्या स्ट्राँग रूमची चावी दोन जणांकडे ठेवली जाते. ज्याची संयुक्त जबाबदारी तत्कालीन बँकेचे वरिष्ठ मॅनेजर अमित कुमार आणि डेप्युटी मॅनेजर अनंत प्रकाश चौधरी यांच्याकडे होती. २८ फेब्रुवारीला जेव्हा गोल्ड स्ट्राँग रुमचा ताबा डेप्युटी मॅनेजर सीमा महला यांच्याकडे सोपवला जात होता. त्यावेळी झालेल्या तपासात सोन्याच्या पाकिटांसोबत छेडछाड झाल्याचे उघड झाले. त्यात तपास केला असता बँक मॅनेजर अमित कुमार यांची भूमिका संशयास्पद आढळली. 

बँकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्कालीन बँक मॅनेजर अमित कुमार, अनंत चौधरी आणि बँकेचे अधिकारी संतोष कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात बँकेचे मॅनेजर अमित कुमार यांनी मागील काही वर्षात कोट्यवधीची जमीन खरेदी केली, ज्यातील एका जमिनीवर डेअरी उभारल्याचे निष्पन्न झाले. त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी आणखी काही संपत्तीही खरेदी केली होती. बँकेच्या तपासात अनेक बनावट गोल्ड लोन दिल्याचेही समोर आले. ज्यांच्या नावावर कागदावर कर्ज दाखवण्यात आले पण प्रत्यक्षात ती माणसेच नाही असं उघड झाले. सोबतच सरकारी योजनेच्या नावावर बनावट कर्जवाटप प्रकारही उघडकीस आले आहेत. बँक घोटाळ्यातील एकूण आकडा समोर आला नाही. अद्याप पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bank Manager's Gold Scam: Crores Embezzled in Film Style Fraud

Web Summary : Rajasthan bank manager defrauded customers, embezzling crores through gold loan scams. Fake gold replaced real, revealing a major fraud. The manager invested in property and dairy farms. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी