मधुकर ठाकूर
उरण - जेएनपीए बंदरात तस्करीच्या मार्गाने आयात करण्यात आलेले प्रतिबंधित चार कंटेनरमधून १७.०७ कोटी किमतीचे ७० मेट्रिक टन चिनी बनावटीचे फटाके जप्त करण्यात आले आहेत.मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या “पायरो हाईस्ट” नावाच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली आहे.याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
सीमाशुल्क तपासणी टाळण्यासाठी हा माल बनावट वस्तूंच्या नावाने घोषित करण्यात आला होता. चीनमधून आयात करण्यात आलेले फटाके आरोपींनी कंटेनरचे सील तोडून कंटेनर फ्रेट स्टेशनवर (सीएफएस) दुसऱ्या वाहनात हलवण्याचा प्रयत्न केला होता. डीआरआय अधिकाऱ्यांनी त्यांना हस्तांतरणा दरम्यान पकडले.तपासात असे निदर्शनास आले की, या टोळीने सीएफएसमध्ये प्रतिबंधित माल काढून टाकण्याची आणि तो परत ठेवण्याची योजना आखली होती. अटक करण्यात आलेले दोन व्यक्ती अडवण्याच्या वेळी कंटेनरच्या सीलमध्ये छेडछाड करत असल्याचे आढळले. “पायरो हाईस्ट” नावाची ही कारवाई डीआरआयला मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीवर आधारित होती. या तस्करी नेटवर्कच्या इतर सदस्यांना ओळखण्यासाठी पुढील चौकशी सुरू असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.
विदेशी व्यापार धोरणांतर्गत फटाक्यांच्या आयातीवर निर्बंध आहेत आणि स्फोटक नियम, २००८ नुसार पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेकडून परवाना घेणे आवश्यक आहे. डीआरआयने म्हटले आहे की, अशा सामग्रीच्या अवैध आयातीमुळे सार्वजनिक सुरक्षा, बंदराच्या पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळीला धोका निर्माण होतो.
Web Summary : DRI seized ₹17.7 crore worth of Chinese firecrackers at JNPA, arresting two. The 70-ton contraband, disguised as other goods, was intercepted during illegal transfer. Investigation continues to identify other members of the smuggling network.
Web Summary : JNPA में DRI ने 17.7 करोड़ के चीनी पटाखे जब्त किए, दो गिरफ्तार। 70 टन का माल अन्य वस्तुओं के रूप में छिपाया गया था, अवैध हस्तांतरण के दौरान पकड़ा गया। तस्करी नेटवर्क के अन्य सदस्यों की जांच जारी है।