शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी मंडळाच्या खात्यातून 5 कोटी गायब, बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कट,  तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 05:58 IST

Crime News : सहायक कामगार आयुक्त अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- मनीषा म्हात्रे

मुंबई : माथाडी मंडळाच्या बचत खात्यातून बनावट धनादेशद्वारे तब्बल ५ कोटी ६ रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पैसे मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
सहायक कामगार आयुक्त अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ फेब्रुवारीपासून रेल्वे गुडस्‌ क्लीअरिंग अँँड फाॅरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड, मुंबई या माथाडी मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. ८ फेब्रुवारीपासून ते या पदावर कार्यरत आहेत.
याच मंडळाचे बचत खाते मस्जिद बंदर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत आहे. डोके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात बँक खात्याचा तपशील मागवला. यात, पासबुक नोंदीतून समोर आलेल्या माहितीत यावर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशाद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्स्फर करण्यात आल्याचे दिसून आले.
त्यांनी तात्काळ याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, हे पैसे बँकेकडून बँकेच्याच मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील शाखेत वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यात, मंडळाच्या बनावट धनादेश आणि स्वाक्षरीचा वापर करण्यात आला. याचे सर्व मूळ धनादेश मंडळाकडे आहेत. अशात, एवढ्या मोठ्या स्वरूपात रक्कम ट्रान्स्फर होत असताना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
अशात, बँक ऑफ बडोदा यांचे संबंधित शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, अधिकारी व इतर अनोळखी इसम यांनी एकमेकांशी फौजदारी कट रचून व संगनमत करून फसवणुकीच्या उद्देशाने व सदरच्या रकमेचा अपहार केल्याचा संशय वर्तवत त्यांनी तात्काळ पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार ६ एप्रिल रोजी पायधुनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दुधगावकर यांनी दुजाेरा दिला. ते पैसे गोठविण्यात आले असल्याची माहितीही समोर आली आहे.

खात्यातील पैसे दुसरीकडे वर्ग
बनावट धनादेशद्वारे मंडळाचे पैसे वर्ग केल्याचे समजताच तातडीने पोलिसांत तक्रार देत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संबंधित खात्यांतील उर्वरित रक्कम अन्य खात्यांत वर्ग केली असून, खात्यात फक्त ८ हजार रुपये ठेवले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा लवकरच याचा तपास लावेल असा विश्वास आहे.
- अशोक लक्ष्मण डोके, प्रभारी अध्यक्ष, माथाडी मंडळ

...अन् गैरव्यवहार झाल्याचे उघड!
मस्जिद बंदर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत याच मंडळाचे बचत खाते आहे. त्यामुळे डोके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात बँक खात्याचा तपशील मागवला. 
पडताळणी करताना, पासबुक नोंदीतून समोर आलेल्या माहितीत बनावट धनादेशाद्वारे खात्यातील तब्बल ५ कोटी ६ लाख रुपये इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्स्फर करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँक