शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

२३ लाखाच्या टायर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, म्होरक्या अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 9:16 PM

Jalgaon News : त्याला ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीत आणखी सहा जण निष्पन्न झाले असून त्यांच्या मागावर पोलिसांचे एक पथक कायम आहे. 

जळगाव - पाळधी, ता.धरणगाव येथील गोदाम फोडून २३ लाख रुपये किमतीचे टायर लांबविणाºया पारधी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून अनिल बिसाराम शिंदे (४५, रा.तेरखेडा, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) या म्होरक्याला शनिवारी अटक करण्यात आली आहे.  त्याला ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीत आणखी सहा जण निष्पन्न झाले असून त्यांच्या मागावर पोलिसांचे एक पथक कायम आहे. पाळधी शिवारात महेश लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे वाहनांच्या टायरचे गोदाम आहे. ९ सप्टेबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी गोदाम फोडून २३ लाख २० हजार ५७० रुपये किमतीचे टायर लांबविण्यात आले होते. तेथील सीसीटीव्ही कॅमे-यात एक जण अस्पष्ट कैद झाला होता. याप्रकरणी गोदामाचे व्यवस्थापक सदाशिव निंबा मराठे (४५, रा.खर्ची, ता. एरंडोल) यांच्या फिर्यादीवरुन धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा असे समांतर तपास करीत होते.एस.पींनाच मिळाली गुप्त माहितीजिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनाच अमरावती व उस्मानाबाद येथून गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंढे यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी फुटेजच्या आधारावर सहायक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे व योगेश सुतार यांच्या मदतीने तांत्रिक माहिती तसेच संशयिताचे स्केच तयार केले करुन ते सोशल मीडियावर राज्यभर व्हायरल केले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात धागेदोरे मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, रामकृष्ण पाटील, सुधारक अंभोरे, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, अनिल देशमुख व इद्रीस पठाण यांचे पथक रवाना केले.

पोलिसांना पाहून अंघोळ सोडून पळाला संशयितसंशयित हा तेरखेडा येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर १ आॅक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना घेऊन अनिलचे घर गाठले असता तो गल्लीतच अंघोळ करीत होता. पोलिसांना पाहून त्याने तसाच अंडरवेअरवर पळ काढला. यावेळी पाठलाग करताना सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक व रामकृष्ण पाटील हे दोघं जखमी झाले. नाईक यांच्या खांद्याला तर पाटील यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव