शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; डोळे फोडले अन् जीभही कापली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 11:42 AM

मागील आठवड्यात उत्तरप्रदेशमध्ये सहा वर्षीय मुलीवर अपहरण करू बलात्कार केला गेला होता.

लखनौ : उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील लखीमपूर खीरी जिल्ह्यात 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी ऊसाच्या शेतात या मुलीचे मृतदेह पोलिसांना सापडले. राज्यातील मागील काही दिवसांतील ही दुसरी भयानक घटना आहे. या प्रकरणी गावातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुलीची गळा दाबून हत्या केली, तिचे डोळे फोडले आणि जीभही कापल्याचा दावा पिडीत मुलीच्या वडीलांनी केला. शुक्रवारी ही घटना घडली. लखनौपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव नेपाळ सीमेनजीक आहे. तिचा मृतदेह एका आरोपिच्या शेतात सापडला. रविवारी मुलीच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला आणि त्यात डोळे फोडल्याचा किंवा जीभ कापली नसल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. शवविच्छेदनात बलात्कार आणि गळा आवळण्याचा उल्लेख केला आहे. 

''तिचे डोळे फोडलेले नाहीत आणि जीभही कापली गेली नाही. तो दावा खोटा आहे. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये असे काहीच आढळले नाही. तिच्या डोळ्यानजीक  ओरखडण्याच्या खुणा आहेत आणि त्या ऊसाच्या पानांमुळे झाल्याचे दिसते,''असे पोलिस अधिकारी खेरी सतेंद्र कुमार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''तिच्यावर बलात्कार झाला आहे. त्याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात बलात्कार, खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.''

शुक्रवारी दुपारपासून ती मुलगी बेपत्ता होती. ''आम्ही तिला सगळीकडे शोधत होतो आणि ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह सापडला. तिचे डोळे फोडले होते आणि जीभ कापली होती. तिच्याच ओढणीनं गळा आवळला होता,''असे मुलीच्या वडीलांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी या घटनेवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विट केलं की,''लखीमपूर खीरी येथे दलित अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ केला गेला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि लाजिरवाणी आहे. अशा घटना घडत आहेत, तर मग सपा आणि भाजपा सरकार यांच्यात काय फरक राहिला? सरकारनं दोषिंवर कठोरात कठोर कारवाई करावी.''    मागील आठवड्यात उत्तरप्रदेश येथील हापूर येथे 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. तिचे अपहरण केले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. ती मुलगी अजूनही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.   

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावती