शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ंआरटीईची प्रवेश प्रक्रिया शेवटच्या आठवड्यात

By admin | Updated: February 4, 2015 23:41 IST

पुणे: प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पुणे महानगरपालिका परिसरातील शाळांमधील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येणा-या आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया येत्या 23 फेब्रुवारीपासून ऑनलाईन पध्दतीने सुरू केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुणे: प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पुणे महानगरपालिका परिसरातील शाळांमधील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येणा-या आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया येत्या 23 फेब्रुवारीपासून ऑनलाईन पध्दतीने सुरू केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शिक्षण विभागातर्फे चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षित जागांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यात पुणे शहरातील शाळांमधील प्रवेश प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून राबविण्याबाबतचे वेळापत्रक शिक्षण विभागाने तयार केले आहे. मागील वर्षी प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेच पालकांना जमा करावी लागणार आहेत. प्रवेश प्रक्रिया सुमारे 15 दिवसांनी सुरु होणार असल्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करण्यासाठी पालकांना आता धावपळ करावी लागणार आहे.
एससी व एसटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच प्रमाणे अपंग विद्यार्थ्यांनी अपंग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकार आहे.तर खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातून एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला, रहिवासी दाखला,आधार कार्ड आदी कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी पालकांनी कागदपत्रे जमा करावीत,असे आवाहन प्राथमिक शिक्षण अधिका-यांनी केले आहे.
----------