राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:24 IST2026-01-20T14:22:02+5:302026-01-20T14:24:21+5:30

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकीकडे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात हॉटेलमध्ये गणिते मांडली जात असतानाच, शिंदेसेनेच्या आमदाराची मोठी घोषणा

ZP Election Chhatrapati Sambhajinagar: First announcement in the state...! BJP, Shiv Sena to contest separately for Zilla Parishad in this place; Impact of municipal elections, mayor election? | राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद?

राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद?

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या एकहाती सत्तेचे पडसाद आता जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात उमटू लागले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकीकडे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात हॉटेलमध्ये गणिते मांडली जात असतानाच, शिंदेसेनेचे दिग्गज आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करून महायुतीला मोठा धक्का दिला आहे.

"माझ्या मतदारसंघात भाजपची फारशी ताकद नाही, त्यामुळे मी तिथे शिवसेना स्वतंत्रपणे लढवणार आहे," असे स्पष्ट करत अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला. यापूर्वी सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीतही सत्तार यांनी असाच पवित्रा घेत भाजपला पराभूत केले होते. आता तोच 'सिल्लोड पॅटर्न' संपूर्ण जिल्हा परिषदेत राबवण्याच्या तयारीत सत्तार दिसत आहेत. महापालिकेत शिंदेसेनेला मिळालेल्या अपयशामुळे निर्माण झालेली मरगळ झटकण्यासाठी सत्तार यांनी हे आक्रमक पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

भाजपचा 'मिशन ६३' आणि जि.प. अध्यक्षपदाचा निर्धार 
दुसरीकडे, महानगरपालिकेत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर भाजपच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, जिल्ह्यातील ६३ पैकी जास्तीत जास्त जागा जिंकून जिल्ह्याचा पहिला भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २०१७ मध्ये भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी एकहाती सत्तेचे स्वप्न भाजपने उराशी बाळगले आहे.

युतीवर प्रश्नचिन्ह 
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यस्तरावर युतीसाठी आग्रही असताना, स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमधील दरी रुंदावत चालली आहे. भाजपची तयारी आणि आता सत्तार यांची घोषणा यामुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत महायुतीचे मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title : पहली घोषणा: भाजपा, शिवसेना जिला परिषद में अलग से लड़ेंगे

Web Summary : नगरपालिका चुनाव के बाद, अब्दुल सत्तार ने घोषणा की कि शिवसेना आगामी जिला परिषद चुनाव में स्वतंत्र रूप से लड़ेगी, जिससे भाजपा-शिंदे सेना गठबंधन को चुनौती मिलेगी। भाजपा का लक्ष्य बहुमत हासिल करना है, जिससे अनिश्चितता बढ़ रही है।

Web Title : First Announcement: BJP, Shiv Sena to Fight Separately in District Council

Web Summary : Following municipal election fallout, Abdul Sattar declared Shiv Sena will contest independently in the upcoming Zilla Parishad elections, challenging the BJP-Shinde Sena alliance. BJP aims for a majority, fueling uncertainty.