शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज येथून तरुण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST

वाळूज महानगर : वाळूज येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने वाळूज पोलीस ठाण्यात दिली. शेख ...

वाळूज महानगर : वाळूज येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने वाळूज पोलीस ठाण्यात दिली.

शेख इम्रान शेख सलीम (वय २१, रा.भारतनगर, वाळूज) हा ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयात जाऊन येतो, असे म्हणून घराबाहेर पडला होता. मात्र, अद्यापपर्यंत इम्रान घरी परत आला नाही. त्याचा भाऊ शेख अलीम याने लहान भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पोहेकॉ. एन. एम. मालोदे हे शोध घेत आहेत.

फोटो क्रमांक- शेख इम्रान

----------------------

साऊथसिटीत सुविधा पुरवा

वाळूज महानगर : साऊथसिटीत विविध नागरी सुविधा परविल्या जात नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील बहुतांश रस्ते कच्चे असल्याने व रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिक व वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागते. स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या वसाहतीत किमान नागरी सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

--------------------------

भारतनगरातील रस्ते झाले अरुंद

वाळूज महानगर : वाळूजच्या भारतनगरात अनेकांनी मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण केल्यामुळे या भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. या कामगार वसाहतीत अनेकांनी घरासमोरच टपऱ्या, छोटी दुकाने, हातगाड्यावर दुकाने थाटल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिक त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. कारवाई करण्याऐवजी ग्रामपंचायत प्रशासन अतिक्रमणांना अभय देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

----------------------

खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

वाळूज महानगर : पंढरपुरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. बुधवारी सायंकाळी या परिसरात पावसाने हजेरी लावल्यानंतर जवळपास अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण ग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करते. गावात सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी शेख मन्सूर, एकनाथ कीर्तीकर आदींनी केली आहे.

-----------------------------

उद्योगनगरीत अ‍ॅपेचालकांची दादागिरी

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अ‍ॅपेरिक्षाचालकांची दादागिरी वाढल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना अक्षरश: ओढतच चालक रिक्षामध्ये बसण्याचा आग्रह करतात. प्रवाशांनी रिक्षात बसण्यास नकार देताच त्यांना शिवीगाळ केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवून वेगाने चालविल्या जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मुजोर अ‍ॅपेरिक्षा चालकाविरुध्द कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

---------------------