दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तरुण ठार; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:51 IST2019-05-25T13:42:02+5:302019-05-25T13:51:00+5:30

साप्ताहिक सुटी असल्याने तरुण नातेवाईकांकडे गेला होता

Young man killed in bike accident; One seriously injured | दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तरुण ठार; एकजण गंभीर जखमी

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तरुण ठार; एकजण गंभीर जखमी

औरंगाबाद :  मुंबई महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार  ठार झाला आणि अन्य एकजण गंभीर जखमी झाला . हा अपघात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला .

दीपक सोमीलाल शिंदे (वय 30 , रा. अघोरी, ता. वैजापुर )असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील जनार्धन वाकळे (वय 55, रा. गवळीधानोरा, ता .गंगापूर) हे या घटनेत  जखमी झाले आहेत . 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शिंदे हा रांजणगाव परिसरातील एका खाजगी कंपनीत काम करत होता. एक दिवसाची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे तो आई-वडिलांना भेटण्यासाठी अघोर येथे दुचाकीने  क्रमांक (एम एच 20, 3701) गावाकडे गेला होता. नातेवाईकांना भेटून शुक्रवारी रात्री  रांजणगावकडे येत असताना खोजेवाडी फाट्यावर समोरून आलेल्या दुचाकी सोबत त्यांच्या दुचाकीची टक्कर  झाली . या अपघातात दीपक चा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती कळताच  एमायडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . जखमी आणि मयत याना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दीपकला तपासून मृत घोषित केले तर सुनील यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद एमआयडीसी वाळूज  पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार कारभारी  देवरे हे करीत आहेत.

Web Title: Young man killed in bike accident; One seriously injured